Header

Shivsena MP Sanjay Raut | ‘ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर देणार’

Shivsena MP Sanjay Raut | ‘ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर देणार’

Shivsena MP Sanjay Raut | shivsena leader sanjay raut criticism on bjp leader kirit somaiya

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Shivsena MP Sanjay Raut | काही दिवसापुर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) टीका करताना शिवराळ भाषा वापरली होती. या मुद्द्यावरुन काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राऊतांवर निशाणा साधला. यानंतर संजय राऊत यांनी देखील पलटवार केला आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठी भाषा ही सक्तीची असू नये म्हणून किरीट सोमय्या हे कोर्टात गेले होते. त्यांच्या विरोधात मी शिवराळ भाषा वापरली. जे महाराष्ट्रद्रोही आहेत, अशा लोकांच्या विरोधात मी अशीच भाषा वापरणार असं ते म्हणाले. तसेच ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे,’ राऊत म्हणाले.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

त्यावेळी बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, ”ED च्या कारवाईमुळे राज ठाकरेंचा भोंगा वाजत आहे. केंद्राकडून त्यांना अभय मिळाल्यामुळे त्यांचा भोंगा वाजू लागला आहे. निराशेतून त्यांचे हे भोंगे वाजत असल्याचे ते म्हणाले. मी ज्या संदर्भात शिवराळ भाषा वापरली त्याचे राज ठाकरेंनी कौतुक करायला पाहिजे होते. कारण ते मराठी अभिमानी म्हणून फिरवत होते. मराठीचे तारणहार आम्हीच आहोत असे ते सांगत होते. त्यामुळे त्यांनी जर माझ्या भाषेचं कौतुक केलं असत तर त्यांच खरे मराठी भाषेचं प्रेम दिसले असते.” असं ते म्हणाले.

 

पुढे संजय राऊत म्हणाले, ”किरीट सोमय्या यांच्याबद्दल मी शिवराळ भाषा का वापरली याचा जर राज ठाकरेंनी अभ्यास केला असता तर माझी वेदना त्यांना समजून घेता आली असती.
तर, सोमय्या यांच्यासह मुंबईतील काही बिल्डर यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे प्रेझेंटेशन तयार केलेय.
मुंबईवर मराठी माणूस आणि शिवसेनेचा हक्क असू नये म्हणून या लोकांची कारस्थाने सुरु आहेत.
हे समजल्यावर माझ्या तोंडून संतापून शिवी बाहेर पडली असेल. पण मी याला शिवी म्हणत नाही.
याबाबत मराठी जनता मला माफ करेल.” असं ते म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

दरम्यान, ”माझ्या भाषेचा शिवसेनेला गर्व असल्याचं त्यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांनी जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपये हडप करणार किरीट सोमय्या तुम्हाला प्रिय असतील तर तुम्ही त्यांना जरुर बोलवा.
त्यांना तुमचं एखादं पदक देऊन टाका, ” असं ते म्हणाले. ‘तुमचा भंपकपणा चालला असल्याचे,’ देखील राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :-  Shivsena MP Sanjay Raut | shivsena leader sanjay raut criticism on bjp leader kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Pune Crime | झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर कोयत्याने वार करुन लुटले; बालेवाडीतील घटना

Jayant Patil On Raj Thackeray | राज ठाकरेंची विचारसरणी नथुराम गोडसेंची; जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

CNG Price Hike In Pune | पुण्यात आता सीएनजी 73 रुपये किलो; 10 दिवसात सीएनजीच्या दरात 11 रुपयानी वाढ

 

The post Shivsena MP Sanjay Raut | ‘ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर देणार’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article