Header

Devendra Fadnavis on Aditya Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले – ‘मर्सिडिज बेबीला संघर्ष काय कळणार ?’ (व्हिडीओ)

Devendra Fadnavis on Aditya Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले – ‘मर्सिडिज बेबीला संघर्ष काय कळणार ?’ (व्हिडीओ)

Devendra Fadnavis on Aditya Thackeray | bjp devendra fadnavis slams aaditya thackeray over 1857 statement

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Devendra Fadnavis on Aditya Thackeray | राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस हे 1857 च्या उठावातही (The Uprising of 1857) असतील, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं होतं. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खोचक टोला लगावला आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सिडीज बेबींना (Mercedes Baby) ना कधी संघर्ष करावा लागला आहे, ना कधी संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांचा संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात, असे फडणवीस म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

त्यावेळी तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. आमच्यासारखे लाखो कारसेवक जे बाबरी पाडली (Babri Masjid Demolition) गेली तेव्हा तिथे उपस्थित होते त्यांना आजही गर्व आहे. त्यावेळी मी नगरसेवक (Corporator) होतो. मी हिंदू आहे आणि त्यामुळे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्मात मी असेल तर 1857 च्या युद्धात मी तात्या टोपे (Tatya Tope) आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या (Rani Laxmibai Jhansi) बाजूने लढत असेल. आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांसोबत (British) युती (Alliance) केली असेल. कारण आता तुम्ही अशा लोकांसोबत युती केली आहे जे 1857 च्या युद्धावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते शिपायांचं बंड होतं, असं म्हणतात, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

 

 

ही सरकारची जबाबदारी आहे
हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्याकरता राजद्रोह लावण्याचा करंटेपणा या सरकारने केला. अशा प्रकारचा आरोप कधीच टिकू शकत नाही, त्यामुळे त्यांना जामीन (Bail) मिळणं स्वाभाविकच आहे, असे फडणवीस म्हणाले. राज्य सरकार (State Government) त्यांना जेलमध्ये टाकून राजद्रोहाचा गुन्हा लावू शकते. तर भोंग्यासंदर्भात त्यांची भूमिका काय असेल याची कल्पना आपल्याला असायला हवी. न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि ते जर आपली भूमिका व्यवस्थित वठवत नसतील तर राज्यातील नेत्यांना आप – आपली भूमिका मांडावी लागेल, असेही फडणवीस म्हणाले.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis on Aditya Thackeray | bjp devendra fadnavis slams aaditya thackeray over 1857 statement

 

हे देखील वाचा :

Maharashtra OBC Political Reservation | ओबीसी समाजासाठी भाजपचा मोठा निर्णय, 27 टक्के तिकिटे ओबीसींना देणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन (व्हिडिओ)

Multibagger Stock | 570 रुपयांपर्यंत वाढू शकतो ‘हा’ मल्टीबॅगर शेयर, दिला आहे 400% पेक्षा जास्त रिटर्न

Pankaja Munde On Thackeray Government | पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला सवाल; म्हणाल्या – ‘अडीच वर्ष काय केलं ?’

 

The post Devendra Fadnavis on Aditya Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले – ‘मर्सिडिज बेबीला संघर्ष काय कळणार ?’ (व्हिडीओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article