Header

Devendra Fadnavis | ‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु?’ मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | ‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु?’ मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | devendra fadanvis attacked cm uddhav thackeray mumbai hindi bhashik uttar bhartiy ralley

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील सभेत भाजपवर (BJP) हल्लाबोल केला होता. हिंदुत्त्वाच्या (Hindutva) मुद्यावरुन त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कडक शद्बात टीका केली. तसेच, केंद्रातील भाजप सरकारवर (BJP Government) महागाईच्या मुद्यावरुन जोरदार टीका केली. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गोरेगावच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या सभेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांची सभा ही लाफ्टर सभा होती, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेची खिल्ली उडवली.

जबाब मिलेगा और ठोक के मिलेगा
उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव न घेता ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावला होता. तसेच सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत. सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…. अरे छट. हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक से मिलेगा, असे फडणवीस म्हणाले होते.

तुझको मिर्ची लगी क्या?
रामजन्मभूमीच्या (Ramjanmabhoomi) आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता. असं म्हटलं तर किती मिर्ची लागली. मै तो अयोध्या जा रहा था, मै तो बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, अरे उद्धवजी, तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू? अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

होय, बाबरी पाडायलाच गेलो होतो
1992 साली फेब्रुवारीमध्ये मी नगरसेवक (Corporator) झालो. जुलैमध्ये मी वकील झालो… डिसेंबरमध्ये नगरसेवक अ‍ॅड फडणवीस बाबरी पाडायला गेला होता, असं फडणवीस म्हणाले. सहलीला चला… सहलीला चला… सहलीला चला, असं मुख्यमंत्री काल म्हणाले. पण नाही… लाठी गोली खायेंगे, मंदिर वही बनाऐंगे आणि आता बनतंय, याचा आनंद आहे.

त्यावेळी माझं वजन 128 किलो होतं
उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले होते, बाबरीवर पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती. मला त्यांना सांगायचंय, आज माझं वजन 102 किलो आहे. बाबरी पाडायला गेलो होतो त्यावेळी माझं वजन 128 किलो होतं. माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न असाल तर हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाचाला खाली आणणारच… बाळासाहेब पवार यांना मैद्याचं पोतं म्हणायचे. आज तुम्ही मैद्याच्या पोत्यावर डोकं टेकलं. त्यामुळे वजनदार माणसाशी जरा जपून… असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadanvis attacked cm uddhav thackeray mumbai hindi bhashik uttar bhartiy ralley

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भीषण अपघात; आईसह मुलीचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

Type 2 Diabetes | ब्लड शुगर ठेवायची असेल कंट्रोल तर ‘या’ एका गोष्टीपासून रहा दूर; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

Pune Crime | पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या 4 नामांकित हॉटेल, हुक्का बारवर गुन्हे शाखेची कारवाई; वॉटर बार, द हाउज अफेअर रुफटाॅप व्हिलेज, ‘अजांत जॅक्स’ चा समावेश

The post Devendra Fadnavis | ‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु?’ मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article