Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आज सोन्या चांदीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,400 रुपये आहे तर चांदीची किंमत (Silver Price) 63,800 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.
भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्याही सोन्या चांदीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.
आजचा सोन्याचा भाव प्रति तोळा (Gold Price) –
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,700 रुपये
आजचा चांदीचा भाव – 63,800 रुपये (प्रति किलो)
हे देखील वाचा :
Pune Crime | पुणे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांकडून अटक
The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.