Header

IPS Sudhir Hiremath | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार

IPS Sudhir Hiremath | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार

IPS Sudhir Hiremath | IPS sudhir hiremath will take additional charge of commissioner of police solapur city police

सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त हरिष बैजल (Solapur CP Harish Baijal) हे 31 मे रोजी सेवानिवृत्त (Retired) होत आहेत. अवघ्या सात महिन्यांचा कालावधी त्यांनी पूर्ण केला आहे. सोलापूर शहर पोलीस दलातील (Solapur City Police Force) आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार (Additional Charge) आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ (IPS Sudhir Hiremath) यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त निवृत्त होत असताना त्यांच्या जागी कोण येणार याची चर्चा सुरु असतानाच आज (सोमवार) आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ (IPS Sudhir Hiremath) यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पोलीस आयुक्त सेवानिवृत्त होत असताना, दुसरीकडे शहराला नवीन कोणता अधिकारी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. वेगवेगळ्या चर्चांमधून अनेकांची नावे पुढे येत होती. मात्र, सोमवारी अचानाक आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलीस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सध्या पुणे येथे सीआयडीमध्ये (Pune CID) उपमहानिरीक्षक (Deputy Inspector General) म्हणून ते कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त हरिष बैजल यांच्यकडून पदभार घेऊन अतरिक्त पोलीस आयुक्त पदाची सुत्रे सुधीर हिरेमठ हाती घेणार आहेत. दरम्यान, आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर पोलिस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार हा तात्पुरत्या कालावधीसाठी राहणार असल्याचं सध्यातरी सांगण्यात आलं आहे.

Web Title :- IPS Sudhir Hiremath | IPS sudhir hiremath will take additional charge of commissioner of police solapur city police

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Char Dham Yatra New Rules | चारधाम यात्रेचे बदलले नियम, 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लागू झाली ‘ही’ अट

GPRS in School Bus Mandatory | महाराष्ट्रात प्रत्येक स्कूलबसमध्ये आता ‘GPS’ बसवणे अनिवार्य; अप्पर पोलीस महासंचालकांनी दिल्या परिवहन विभागाला सूचना

Post Office FD | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त लाभ; जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

Pune Crime | हुंड्याच्या व भिक मागण्याच्या उद्देशाने 3 वर्षाच्या मुलीचे अपहरण, सराईत महिला आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांकडून अटक

The post IPS Sudhir Hiremath | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article