Header

Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंचा भोंगा, हिम्मत असेल तर..’ – किरीट सोमय्या

Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंचा भोंगा, हिम्मत असेल तर..’ – किरीट सोमय्या

Kirit Somaiya on Sanjay Raut | BJP leader kirit somaiya reaction to uddhav thackeray and sanjay raut file affidavit in supreme court

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Kirit Somaiya on Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी जागतिक व्यंगचित्र दिनाच्या (World Cartoon Day) शुभेच्छा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे. ‘ज्यांच्यामध्ये बाळासाहेबांसारखी व्यंगचित्र कलेची क्षमता होती, असं आम्हाला वाटायचं, त्यांनी ते सोडून भोंग्यांचं राजकारण सुरू केलं.’ असं राऊत म्हणाले. यानंतर आता भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी जोरदार पलटवार केला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

किरीट सोमय्या म्हणाले की, ”संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा भोंगा आहे.
या भोंग्यात हिम्मत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाऊन एफिडेविट फाईल करावे,” असा इशारा सोमय्या यांनी दिला.
‘पहाटे 5 वाजता वाजणारे भोंगे उतरवले हे या भोंग्याला कळत नाही का ?,’ असा सवाल देखील सोमय्यांनी केला आहे.
तसेच, ‘तुम्ही पूर्ण हिरवे झाले आहात, त्यामुळे भगवा रंग आणि हिंदुत्वाचे रक्षण आता आम्ही करणार आहोत,’ असं म्हणत सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. (Kirit Somaiya on Sanjay Raut)

 

”तुम्ही पूर्ण हिरवे झाले आहात, त्यामुळे भगवा रंग आणि हिंदुत्वाचे रक्षण आता आम्ही करणार आहोत.
फक्त मशिदीवरील भोंगे उतरवायचे काम नाही. तुम्ही तर गणेशोत्सवामध्ये हे भोंगे उतरवले होते.
भाजपाने खूप मोठी जबाबदारी मला दिली आहे. मला महाराष्ट्र हा भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे.
जनतेने हे काम मला दिले आहे आणि ते मी करत आहे,” असं देखील किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Kirit Somaiya on Sanjay Raut | BJP leader kirit somaiya reaction to uddhav thackeray and sanjay raut file affidavit in supreme court

 

हे देखील वाचा :

MNS | मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Vasant More | वसंत मोरेंच्या WhatsApp स्टेटसची एकच चर्चा; म्हणाले – ‘आपण चुकीच्या दिशेने आहोत..’

BJP on Uddhav Thackeray | सचिन वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर भाजपचे गंभीर आरोप

 

The post Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंचा भोंगा, हिम्मत असेल तर..’ – किरीट सोमय्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article