Header

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Rain Update | गेल्या चार ते पाच दिवसापुर्वी मान्सूनने अंदमानात (Andaman) प्रवेश केला आहे. त्यानंतर मान्सून केरळात (Keral) दाखल झाला. त्यानंतर महाराष्ट्रात पावसाचं (Maharashtra Monsoon Rain Update) आगमन कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. मात्र गेल्या दोन दिवसांपुर्वी पाऊस अरबी समुद्रात (Arabian Sea) अवतरला असला तरी राज्यात पसरला नसल्याचं चित्र आहे. कारण मान्सून, अरबी समुद्रात दाखल झाला असला तरीही तिथंच त्यानं विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात पाऊस पडण्याचा कालावधी लांबणीवर पडला असल्याचे हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) सांगितलं.

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवस झाली सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) या ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. पहिल्यांदा पाऊस अरबी समुद्रात दाखल झाला. तेथुन काही ठिकाणी पाऊस कोसळला पण पुन्हा त्याने विश्रांती घेतली असल्याचं समोर आलं आहे. मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचे आगमन 2 दिवसांनी लांबणीवर गेले आहे. आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर 5 जूनला कोकणात (Konkan) आणि 7 जूनला मुंबईत (Mumbai) दाखल होणार असल्याचं हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) सांगितलं आहे.

दरम्यान, याअगोदर मान्सून मुंबईत 5 जूनला दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, सध्या त्यासाठी परिस्थिती पूरक नसल्याचे दिसत आहे. 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. तसेच, आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर राज्यात 3 ते 9 जूनमध्ये तो धडकणार आहे. 7 जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे.

Web Title : Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

The post Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article