Header

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित?

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित?

mns chief raj thackeray ayodhya tour mns chief raj thackeray ayodhya tour likely to be postponed information of sources 

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मागील अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) जाणार अशी मोठी चर्चा रंगली आहे. त्यासाठी 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचं स्पष्ट देखील करण्यात आलं होतं दरम्यान आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा कदाचित स्थगित होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. (Raj Thackeray’s visit to Ayodhya may be postponed)

पुणे दौऱ्यावर असलेले राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला रवाना झाले होते. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यामुळे शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आता एका सुत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो. दरम्यान याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून खूद्द राज ठाकरे याबाबत माहिती देतील असं बोललं जात आहे.

दरम्यान, एकीकडे मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. तर दुसरीकडे त्यांना विरोध होताना दिसत आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांचा विरोध होत आहे.

“आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावे,” असं भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी (Iqbal Ansari) यांनी देखील राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता. दरम्यान, आता अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे मनसैनिकांचे लक्ष लागून आहे.

Web Title :- mns chief raj thackeray ayodhya tour mns chief raj thackeray ayodhya tour likely to be postponed information of sources

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळणार” – अजित पवार

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी – IMD

The post MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article