Header

Multibagger Stock | 570 रुपयांपर्यंत वाढू शकतो ‘हा’ मल्टीबॅगर शेयर, दिला आहे 400% पेक्षा जास्त रिटर्न

Multibagger Stock | 570 रुपयांपर्यंत वाढू शकतो ‘हा’ मल्टीबॅगर शेयर, दिला आहे 400% पेक्षा जास्त रिटर्न

Multibagger Stock | gokaldas exports share may touch 570 rupee level icici securities bullish on stock

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | गारमेंट्स आणि अ‍ॅपरल्स उद्योगाशी (garments and apparels industry) संबंधित कंपनीने मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. या कंपनीने गेल्या वर्षभरात लोकांना 421 टक्के रिटर्न दिला आहे. या कंपनीचे नाव गोकलदास एक्सपोर्ट्स (Gokaldas Exports – GEL) आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज गोकलदास एक्सपोर्ट्सच्या शेअर्सवर बुलीश आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की कंपनीचे शेअर्स 570 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. कंपनीच्या शेअरनी यावर्षी आतापर्यंत 40 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

बाय रेटिंगसह मिळाले 570 रुपयांची टार्गेट प्राईस

ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजने गोकलदास एक्सपोर्ट्स (जीईएल) ला बाय रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्ससाठी 570 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे, जी सध्याच्या शेअर्सच्या किंमतीपेक्षा 23 टक्क्यांनी जास्त आहे. 2 मे रोजी मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स 15.67 टक्क्यांच्या उसळीसह 462.20 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 88.45 रुपये आहे. (Multibagger Stock)

 

त्याच वेळी, 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 474.80 रुपये आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज गोकलदास एक्सपोर्टला अ‍ॅपरल सेगमेंटमध्ये स्ट्रक्चरल लाँग टर्म स्टोरी म्हणून पसंती दर्शवते.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की कंपनीचे उत्पादन सध्या पीक युटिलायजेशन लेव्हलवर ऑपरेट करत आहे.
कंपनीकडे पुढील 6 महिन्यांसाठी मजबूत ऑर्डर बुक आहेत.

 

2 वर्षात शेअर 28 रूपयांवरून 460 रुपयांच्या पुढे गेला

22 मे 2020 रोजी गोकलदास एक्स्पोर्ट्सचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर रु. 28.45 वर व्यवहार करत होता.
2 मे 2022 रोजी कंपनीचा शेअर 462.20 रुपयांवर बंद झाला आहे.
कंपनीच्या शेअर्सनी 2 वर्षात जबरदस्त रिटर्न दिला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 22 मे 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि या कालावधीत आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 16 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

 

ब्रोकरेज हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की अ‍ॅपरल निर्यातीवर सरकारचे वाढलेले लक्ष आणि जागतिक ब्रँडची चीन+1 रणनीती गोकलदास एक्सपोर्ट (जीईआय) सारख्या कंपन्यांना दीर्घकालीन वाढीच्या संधी देत आहे.

 

Web Title :- Multibagger Stock | gokaldas exports share may touch 570 rupee level icici securities bullish on stock

 

हे देखील वाचा :

Pankaja Munde On Thackeray Government | पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला सवाल; म्हणाल्या – ‘अडीच वर्ष काय केलं ?’

Chitra Wagh on Sanjay Raut | चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल; म्हणाल्या – ‘मग बाळासाहेबांनीच राज यांना हिंदुत्त्वाचे चुकीचे धडे शिकवले का ?’

MNS Chief Raj Thackeray | अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे ? राज ठाकरेंचा सवाल !

 

The post Multibagger Stock | 570 रुपयांपर्यंत वाढू शकतो ‘हा’ मल्टीबॅगर शेयर, दिला आहे 400% पेक्षा जास्त रिटर्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article