Header

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून गुंडावर कोयत्याने सपासप वार, खडकी परिसरातील घटना

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून गुंडावर कोयत्याने सपासप वार, खडकी परिसरातील घटना

Pune Crime | Attempt Kill Half Murder Pune Criminals Khadki Police Station Ambedkar Chowk

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | पूर्ववैमनस्यातून गुंडावर सराईत गुन्हेगारांनी (Pune Criminals) कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. ही घटना खडकीतील (Khadki) महादेववाडी येथील सर्वधर्म समभाव मित्र मंडळ ते आंबेडकर चौक (Ambedkar Chowk Khadki) दरम्यान गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडली. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी खडकीतील एका १७ वर्षाच्या मुलाने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मलंग कुरेशी, अमित फिरोज खान (वय २०, रा. कुबा हाईटस, घोरपडी), अ‍ॅलेक्स, दास व त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. अमित खान याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. तसेच मंलग कुरेशी, अमित खान आणि अ‍ॅलेक्स हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. फिर्यादी आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत सर्वधर्म समभाव मित्र मंडळाजवळ बोलत थांबला होता. यावेळी पूर्वीच्या भांडणाचे कारणावरुन आरोपी मोटारसायकलवरुन आले. त्यांनी हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या पायावर मारुन त्याला रस्त्यावर पाडले. मलंग कुरेश याने कोयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी याने हाताने तो अडविला असता फिर्यादीच्या हाताला जखम झाली. अमित खान याने कोयत्याने दंडावर वार (Attempt To Kill) करुन जखमी केले. फिर्यादी पळून जात असताना अ‍ॅलेक्स याने सिमेंटचा गठ्ठा उचलून फिर्यादीला फेकून मारला. इतरांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कोयते हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करीत आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : Pune Crime | Attempt Kill Half Murder Pune Criminals Khadki Police Station Ambedkar Chowk

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान चालविणाऱ्या केंद्राचा पर्दाफाश; ग्रामीण पोलिसांकडून तिघांवर FIR

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना होणार फायदा, सरकारने घर खरेदी करण्यासाठी दिला मोठा दिलासा

Pune Police | बदली होऊनही गैरहजर राहणारे पुण्यातील 3 पोलीस अंमलदार निलंबित

 

The post Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून गुंडावर कोयत्याने सपासप वार, खडकी परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article