Header

Restrictions On Sugar Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी; खाद्य तेलानंतर साखरेच्या दरात घट

Restrictions On Sugar Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी; खाद्य तेलानंतर साखरेच्या दरात घट

Restrictions On Sugar Exports | central modi govt imposes restrictions on sugar exports from june

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Restrictions On Sugar Exports | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल-डिझेलवरील (Petrol-Diesel) करकपात केली. तसेच खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमतीत देखील घट केली आहे. आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी (Restrictions On Sugar Exports ) घालण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची उपलब्धता वाढवणे आणि दरवाढीला आळा घालण्यासाठी सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.

 

यापूर्वी सूर्यफूल (Sunflower) आणि सोयाबीन तेलाच्या (Soybean Oil) आयातीवरील कस्टम ड्युटी सरकारने रद्द केली होती. या निर्णयाचा फटका थेट खाद्यतेलाच्या दरावर बसणार आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (Directorate General of Foreign Trade-DGFT) ने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘साखर (कच्ची, शुद्ध आणि पांढरी साखर) निर्यात 1 जून 2022 पासून प्रतिबंधित श्रेणीत ठेवण्यात आली आहे. (Restrictions On Sugar Exports)

 

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs) माहितीनुसार, सीएक्सएल और टीआरक्यू अंतर्गत युरोपियन युनियन आणि यूएसमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेवर हे निर्बंध लागू होणार नाहीत. असं देखील या अधिसूचनेत सांगण्यात आले. या प्रदेशांमध्ये सीएक्सएल आणि टीआरक्यू अंतर्गत काही प्रमाणात साखर निर्यात केली जातेय. दरम्यान, 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अथवा आगामी आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल, साखर संचालनालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या विशिष्ट परवानगीनेच साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल. असं डीजीएफटीने जारी केलेल्या आदेशात म्हटलंय.

दरम्यान, सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे की, भारतातील साखरेची देशांतर्गत उपलब्धता
आणि दर स्थिरता राखण्यासाठी 1 जूनपासून साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर साखर हंगामात देशांतर्गत उपलब्धता आणि दर स्थिरता राखण्यासाठी,
100 LMT (लाख मेट्रिक टन) पर्यंत साखर निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

 

Web Title :- Restrictions On Sugar Exports | central modi govt imposes restrictions on sugar exports from june

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

The post Restrictions On Sugar Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी; खाद्य तेलानंतर साखरेच्या दरात घट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article