Header

Vasant More | वसंत मोरेंच्या WhatsApp स्टेटसची एकच चर्चा; म्हणाले – ‘आपण चुकीच्या दिशेने आहोत..’

Vasant More | वसंत मोरेंच्या WhatsApp स्टेटसची एकच चर्चा; म्हणाले – ‘आपण चुकीच्या दिशेने आहोत..’

Vasant More | mns vasant more status on social media goes viral

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Vasant More | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केलेले मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांची सध्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसची (WhatsApp Status) जोरदार चर्चा सुरु आहे. मागील घडलेल्या घडामोडीनंतर राज्याचं लक्ष वसंत मोरेंकडे आहे. राज ठाकरे यांच्या पुण्याच्या दौऱ्यातही वंसत मोरे न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत्या. मात्र, आता मोरे यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल झालं आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

वसंत मोरे (Vasant More) यांनी स्टेटस मध्ये म्हटलं आहे की, ”ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही, निंदा नाही, विरोध नाही त्यांनी रस्ता बदला आपण चुकीच्या दिशेने आहोत आणि आजकाल याचे अनुभव येत आहेत.” असं स्टेटस त्यांनी ठेवलं आहे. यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.

 

या आगोदर वसंत मोरे यांनी भोंग्यांविरोधात त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरेंच्या भेटीनंतर ठाण्यातील सभेत भाषण देखील केलं होतं. मात्र, पुण्याच्या कार्यक्रमात ते अनुपस्थित होते. मागील दोन दिवसांपासून वसंत मोरे तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मनसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यात मोरे गायब असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात होते.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

वसंत मोरे काय म्हणाले होते Facebook मधून ? 

”पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले.” म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे हार्दिक आभार…!

 

 

Web Title :- Vasant More | mns vasant more status on social media goes viral

 

 

हे देखील वाचा :

BJP on Uddhav Thackeray | सचिन वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर भाजपचे गंभीर आरोप

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Devendra Fadnavis on Aditya Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले – ‘मर्सिडिज बेबीला संघर्ष काय कळणार ?’ (व्हिडीओ)

 

The post Vasant More | वसंत मोरेंच्या WhatsApp स्टेटसची एकच चर्चा; म्हणाले – ‘आपण चुकीच्या दिशेने आहोत..’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article