Maharashtra Political Crisis | फ्लोअर टेस्टसाठी एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार

बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर फ्लोअर टेस्टसाठी आपण उद्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत (Mumbai) येणार असल्याचे स्वत: शिंदे यांनी सांगितले. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्रावरील राजकीय संकट लवकर टळू दे असं मागणं देवीकडे मागितलं असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे देवीच्या दर्शनासाठी परवानगी मागितली होती. (Maharashtra Political Crisis)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीचे दर्शन हा श्रद्धेचा विषय आहे. देवीकडे सर्वच जण आपलं मागणं घेऊन येतात. देवी त्यांना आशीर्वाद देते. त्यामुळे आपण इकडे आलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत अशी मागणी देवीकडे केली आहे. उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईत येणार आहे. फ्लोअर टेस्टसाठी जी काही प्रक्रिया करायची आहे ती आम्ही पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Political Crisis)
दरम्यान, प्रसार माध्यमातून दाखवण्यात येत असलेल्या वृत्ताचा आधार घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान भवन सचिवालय यांना पत्र पाठवले आहे.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, प्रसारमाध्यमातून शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला असल्याचे दाखवण्यात येत आहे.
तसेच अपक्ष आमदारांनी ई-मेल द्वारे तर विरोध पक्ष असलेल्या भाजपाने पत्राद्वारे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचा दावा केला आहे.
विरोधी पक्षाने घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी केली आहे.
माध्यमांमधील बातम्या पाहता मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणी अपरिहार्य असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे,
असे राज्यपालांनी या पत्रात नमूद केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
The post Maharashtra Political Crisis | फ्लोअर टेस्टसाठी एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार appeared first on बहुजननामा.