Header

PM Kisan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! घरबसल्या काढू शकता पैसे

PM Kisan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! घरबसल्या काढू शकता पैसे

PM Kisan Yojana | farmers will be able to withdraw money received under pm kisan samman nidhi at home

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | टपाल विभागाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) अंतर्गत शेतकर्‍यांना मिळणारी रक्कम सहजपणे मिळावी यासाठी उपक्रम सुरू केला आहे. टपाल विभागाच्या मदतीने शेतकरी आता ’पीएम किसान सन्मान निधी’ चे पैसे त्यांच्या घरी प्राप्त करू शकतील.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आता एटीएम किंवा बँकेत जाण्याची नाही गरज !
वाराणसी विभागाचे पोस्टमास्टर जनरल कृष्ण कुमार यादव म्हणाले,
किसान सन्मान निधीमधून पैसे काढण्यासाठी शेतकर्‍यांना बँकेच्या शाखेत किंवा एटीएममध्ये जावे लागते आणि ग्रामीण भागात ते अवघड आहे.
शेतकर्‍यांना ते सहज प्राप्त व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

के. के. यादव म्हणाले की, पीएम किसान सन्मान निधीचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लाभ मिळावा यासाठी पोस्ट विभाग ’आपका बँक, आपके द्वार’ मोहीम सुरू करत आहे.

 

असे काढू शकता किसान सन्मान निधीचे पैसे
त्यांनी सांगितले की, शेतकरी घरबसल्या आधारसोबत जोडलेल्या खात्यातून आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) सह बँक खात्यातून किसान सन्मान निधीचे पैसे काढू शकतात.
त्यासाठी टपाल प्रतिनिधी त्यांच्या घरी येणार आहे.

ही मोहीम 4 जूनपासून सुरू होणार असून 13 जूनपर्यंत चालणार असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, पात्र शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात जे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात.
शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्षातून तीनदा दोन हजार रुपये पाठवले जातात.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- PM Kisan Yojana | farmers will be able to withdraw money received under pm kisan samman nidhi at home

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

Pankaja Munde | ‘माझे कार्यकर्ते सोबर, धनंजय मुंडेचे कार्यकर्ते दबंग’ – पंकजा मुंडे

Pune Pimpri Crime | महिलेवर बलात्कार करुन अश्लिल फोटो पतीला पाठवून बदनामी; उस्मानाबादच्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी केले अटक

 

The post PM Kisan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! घरबसल्या काढू शकता पैसे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article