Pune Crime | पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना ! बाहुलीला फाशी दिल्यानंतर 8 वर्षीय मुलाने घेतला गळफास; शहरात प्रचंड खळबळ

पिंपरी – चिंचवड : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | पिंपरी चिंचवड मधील
(Pimpri Chinchwad Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बाहुलीला फाशी दिल्यानंतर 8 वर्षीय मुलाने स्वत:ही आत्महत्या (Suicide In Pune)
केल्याची घटना घडली आहे. मुलाने स्वत:ही तोंडावर तसाच कापड टाकलं आणि मग
गळफास (Pune Crime) घेतला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली
आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी थेरगावमध्ये (Thergaon) घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी की, 8 वर्षीय मुलगा हा घरात बाहुल्यांसोबत खेळत होता. यावेळी घरात त्याची आई देखील होती. मुलगा बाहुल्या सोबत खेळत असल्याने आई कामात व्यस्त राहिली. बराचवेळ मुलाचा काही खेळण्याचा आवाज आला नाही, म्हणून आईने मुलाकडे पाहिले तर, तेव्हा आईला मुलगा खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच त्याच्या बाहुलीला त्याने टॉवेलने फाशी दिली होती. (Pune Crime)
दरम्यान, 8 वर्षीय मुलाला हॉरर चित्रपट पाहण्याची सवय होती. त्यातून त्याने खेळता खेळता आपल्या बाहुलीला फाशी दिली.
टॉवेलने बाहुलीला फाशी दिल्याने बाहुली मेल्याचे 8 वर्षीय मुलाला वाटले.
यातून दु:ख होऊन त्याने स्वत:ही खिडकीला गळफास लावून घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे.
असं पोलिसांकडून (Pimpri Chinchwad Police) सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबासह सर्वानाच एक धक्का बसला असून संपूर्ण परिसर हादरून गेलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | 8 year old boy commits suicide after hanging her toy to death incident in thergaon pimpri chinchwad of pune
हे देखील वाचा :
The post Pune Crime | पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना ! बाहुलीला फाशी दिल्यानंतर 8 वर्षीय मुलाने घेतला गळफास; शहरात प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.