Header

Pune Crime | पत्नीने HDFC च्या बँक मॅनेजरशी संगनमत करुन केली फसवणूक ! 40 लाखांच्या फसवणूक प्रकरणात बँकेच्या मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime | पत्नीने HDFC च्या बँक मॅनेजरशी संगनमत करुन केली फसवणूक ! 40 लाखांच्या फसवणूक प्रकरणात बँकेच्या मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime Wife cheated by conspiring with HDFCs bank manager Four persons including a bank manager have been booked in a Rs 40 lakh fraud case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कंपनी स्थापन न करता संयुक्त खात्यातील पैसे बँक मॅनेजरशी (Bank Manager) संगनमत करुन वैयक्तिक खात्यात वळविले (Conspiracy For Fraud).
तसेच बनावट सही (Bogus Signature) करुन ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police)
एच डी एफ सी बँकेच्या (HDFC Bank) मॅनेजर व पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी डॅरिल इव्हान रसकिन्हा (वय ४९, रा. एन आय बी एम रोड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३१६/२२) दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी नोएला डॅरिल रसकिन्हा (वय ४६), फ्लाविया पॅन्ड्रानिला परेरा, डेरेक रॉबिन्स (रा. वाघोली)
आणि एच डी एफ सीच्या बोट क्लब रोड शाखेचे बँक मॅनेजर (HDFC Bank Boat Club Road Branch Manager)
अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
हा प्रकार २०१६ ते २०१९ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॅरिल आणि नोएला हे पती पत्नी आहेत.
आरोपी यांनी कट रचून अँसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यासाठी फिर्यादीकडून १० लाख रुपये घेतले.
कंपनी स्थापन न करता फिर्यादी आरोपी नोएला यांच्या संयुक्त एच डी एफ सी खात्यातील व डिमॅट खात्यातील ५ लाख रुपये नोएला हिने स्वत:च्या वैयक्तिक खात्यात वळविले.
एच डी एफ सी बँकेच्या मॅनेजरच्या मदतीने फिर्यादीचे २५ लाख रुपयांचे शेअर्स फिर्यादीची खोटी सही करुन नोएला हिच्या खात्यात वळविले.
फिर्यादी यांचे वडिल इव्हान रसकिन्हा यांना फिर्यादी व नोएला यांचे संयुक्त खात्यावरुन प्रतिनिधी वरुन काढून टाकण्यासाठी फिर्यादी यांची संमती आहे, असे भासविले.
इतरांच्या मदतीने नोएला हिने बनावट सही करुन फिर्यादी यांची एकूण ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Wife cheated by conspiring with HDFCs bank manager Four persons including a bank manager have been booked in a Rs 40 lakh fraud case

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा 


The post Pune Crime | पत्नीने HDFC च्या बँक मॅनेजरशी संगनमत करुन केली फसवणूक ! 40 लाखांच्या फसवणूक प्रकरणात बँकेच्या मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article