Header

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

Pune Crime | Retired Assistant Commissioner of Police (Retired ACP) bitten by pet Rottweiler dog

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | रॉटव्हिलर जातीचा कुत्रा हिंसक असून त्याला रहिवासी भागात पाळण्यास मनाई आहे, असे सांगितले होते. असे असताना त्याला मोकळा ठेवल्याने तो सकाळी मॉर्निंग वॉकला (Morning Walk) गेलेल्या निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावल्याचे समोर (Dog Bit) आले आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) तुषार भगत व त्याचे वडिल (रा. वीरभद्रनगर, बाणेर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेरमधील वीरभद्रनगरमधील सार्वजनिक रोडवर बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त असून बाणेरला रहातात. त्यांच्या गल्लीत राहणार्‍या तुषार भगत याने रॉटव्हिलर जातीचा कुत्रा पाळला आहे. ४ महिन्यांपूर्वी फिर्यादी हे पायी जात असताना तो त्यांच्या अंगावर धावून आला. तेव्हा त्यांनी हातातील बॅट मारल्याने तो पळून गेला होता. त्यांनी लागलीच कुत्र्याचा मालक तुषार भगत व त्याचे वडिल यांना बोलावून तुमचा कुत्रा हिंसक जातीचा असल्यामुळे त्यास रहिवासी विभागामध्ये ठेवण्यास मनाई आहे, असे सांगून त्याला मोकळा सोडल्यास तो लोकांच्या जिवितास हानी पोहचविण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. तरीही त्यांचे न ऐकता त्यांनी त्याला खुले सोडले होते. (Pune Crime)

 

फिर्यादी हे बुधवारी सकाळी साडेसात वाजता त्यांचा पाळीव कुत्रा बास्को याला मार्निंग वॉकसाठी घेऊन जात होते.
त्यावेळी तुषार भगत यांच्या मालकीचा कुत्रा त्यांच्या व त्यांच्या कुत्राच्या अंगावर आला.
तो फिर्यादी यांच्या कुत्र्याला चावला.
त्याला सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असताना त्याने फिर्यादी यांच्या डावे हाताच्या तळहातास व संपूर्ण मनगटास वाचा घेऊन गंभीर जखमी केले.
फिर्यादी यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये (Jupiter Hospital Pune) उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Retired Assistant Commissioner of Police (Retired ACP) bitten by pet Rottweiler dog

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन काढले 9 लाखांचे कर्ज

Devendra Fadnavis | ‘भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल’ – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Political Crisis | ‘मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा…’ ठाकरे सरकार पडल्यानंतर फडणवीसांचे जुने ट्विट व्हायरल

 

The post Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article