Header

Pune Crime | सिंहगड घाट रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Crime | सिंहगड घाट रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Crime | An adult commits suicide by hanging himself from a tree on Sinhagad Ghat road of pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | सिंहगडावर जाणाऱ्या घाट रस्त्यालगत (Sinhagad Ghat Road) परिसरात एकाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) घडली आहे. विलास तुकाराम खामकर (Vilas Tukaram Khamkar) (वय 46, रा. आतकरवाडी, घेरा सिंहगड, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत खामकर हे आतकरवाडीतून (Atkarwadi) जाणाऱ्या सिंहगडाच्या पायवाटेवर लिंबू सरबत विकण्याचा व्यवसाय करत होते. (Suicide on Sinhagad Ghat Road)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

विलास खामकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ते दारु पिऊन आले की घरात वादविवाद व्हायचे. दरवेळी ते ‘मी जीव देईन’ अशी धमकी द्यायचे. काल त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी दारू का पिलात ? अशी विचारणा केल्याने त्यांचे पत्नीशी भांडण झाले. त्या रागातून ते घरातून निघून गेले व गळफास घेऊन आत्महत्या केली. (Pune Crime)

 

दरम्यान, सिंहगडाच्या घाट रस्त्यावर एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती समजताच घेरा सिंहगडचे पोलीस पाटील निलेश चव्हाण (Police Patil Nilesh Chavan) घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर हवेली पोलीस ठाण्याचे (Haveli Police Station) पोलिसही दाखल झाले.
त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आला असून हवेली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
दरम्यान, नेमकी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तर, दारुचे व्यसन व कौटुंबिक वादविवाद यातून सदर व्यक्तीने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | An adult commits suicide by hanging himself from a tree on Sinhagad Ghat road of pune

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Maharashtra Monsoon Update | आगामी 2 दिवसांत मोसमी पाऊस कोकणात; ‘या’ दिवशी मुंबईत बरसणार – IMD

ATM Cash Withdrawal | एटीएममधून कॅश काढताना ‘या’ लाईटकडे आवश्य ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाऊंट

 

The post Pune Crime | सिंहगड घाट रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या, प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article