Header

Pune Crime | पुढे जाण्यास सांगितल्याने हेल्मेट मारुन तरुणाचे नाक केले फ्रॅक्चर; हडपसर मुंढवा रोडवरील घटना

Pune Crime | पुढे जाण्यास सांगितल्याने हेल्मेट मारुन तरुणाचे नाक केले फ्रॅक्चर; हडपसर मुंढवा रोडवरील घटना

Pune Crime | Told to go ahead hit the young man with a helmet and fractured his nose Incident on Hadapsar Mundhwa Road

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | पाठीमागून सातत्याने हॉर्न वाजविणार्‍यांना हाताने पुढे जा असे सांगितल्याच्या रागातून दोघांनी एका मोटारसायकलवरील तरुणाला हेल्मेटने मारहाण (Helmet) करुन त्याचे नाक फ्रॅक्चर (Nose Fracture) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

या प्रकरणी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील एका ३७ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२३/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी हे एका कंपनीत सिक्युरिटी सुपरवायझर (Security Supervisor) आहेत. ते हडपसर मुंढवा रोडने (Hadapsar Mundhwa Road) ३० मे रोजी रात्री दहा वाजता मोटारसायकलवरुन जात होते.
त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरुन येणारे दोघे जण सातत्याने हॉर्न वाजवत चालले होते.
म्हणून त्यांना फिर्यादी यांनी हाताने पुढे जा असे सांगितले. तेव्हा ते दोघे चालू गाडीवरुन शिवीगाळ करु लागले.
तेव्हा मुंढवा पुलावर (Mundhwa Bridge) त्यांनी गाडी थांबविली.
ते दोघे त्यांच्याजवळ येऊन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करु लागले.
त्यांच्या हातातील हेल्मेट घेऊन त्याने त्यांच्या तोंडावर मारहाण केली.
त्यांच्या नाकातून रक्त येऊन ते खाली पडले ते पाहून दोघे पळून गेले.
त्यांना नोबेल हॉस्पिटल (Noble Hospital Pune) येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या तोंडाचे सिटी स्कॅन (CT Scan) केले असता डॉक्टरांनी त्यांचे नाकाचे हाड फ्रॅक्चर (Nasal Bone Fractures) झाले असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Web Title :- Pune Crime | Told to go ahead hit the young man with a helmet and fractured his nose Incident on Hadapsar Mundhwa Road

 

हे देखील वाचा :

Pune News | 6 वर्षीय चिमुकलीच्या पोटात अडकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली बाहेर; पुण्यातील ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरांना यश

Pune Crime | सिंहगड घाट रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

 

The post Pune Crime | पुढे जाण्यास सांगितल्याने हेल्मेट मारुन तरुणाचे नाक केले फ्रॅक्चर; हडपसर मुंढवा रोडवरील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article