Header

Pune Crime | जुन्या भांडणाच्या रागातून गुंडांकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार; घोरपडी पेठेतील घटना

Pune Crime | जुन्या भांडणाच्या रागातून गुंडांकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार; घोरपडी पेठेतील घटना

Pune Crime Attempt To Kill Murder Khadak Police Station Pune Criminals Ghorpadi Peth

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार (Attempt To Kill) करुन लोखंडी पट्टी, दगडाने मारहाण करुन गुंडाच्या (Pune Criminals) टोळक्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

 

याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) जुबरे ऊर्फ वडी शेख (Jubre alias Wadi Shaikh), राहुल दत्तु शेडगे Rahul Dattu Shedge (वय २०, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ), अभिषेक देवीदास ससाणे Abhishek Devidas Sasane (वय १८, रा. लोहियानगर), आदर्श हणवते, रोहित थोरात व आणखी एकावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सौरभ गौतम धावरे (वय २३, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८२/२२) दिली आहे. हा प्रकार घोरपडी पेठेतील (Ghorpadi Peth) जय जवान मित्र मंडळाजवळ शनिवारी पहाटे ३ वाजता घडला.

 

जुबरे शेख, राहुल शेडगे आणि आदर्श हनवते हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत (Criminals On Pune Police Record).
पोलिसांनी जुबरे व अभिषेक यांना अटक केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती.
या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
जुबरे शेख याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर जबर वार केले. राहुल शेडगे याने लोखंडी पट्टीने फिर्यादीचे बरगडी, पाठीवर मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीचा मित्र समीर याला अभिषेक याने दगड फेकून मारुन जखमी केले.
इतरांनी फिर्यादी यांना लाथाबुक्कयांनी मारहाण करुन जबर जखमी केले.
पोलीस उपनिरीक्षक कुतवळ अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Murder Khadak Police Station Pune Criminals Ghorpadi Peth

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा 


 

 

The post Pune Crime | जुन्या भांडणाच्या रागातून गुंडांकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार; घोरपडी पेठेतील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article