Header

Pune Crime | पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारी असलेल्या गुंडाचे टोळके गजाआड; पुणे स्टेशनवरुन येणार्‍यांना लुटण्याचा होता प्लॅन

Pune Crime | पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारी असलेल्या गुंडाचे टोळके गजाआड; पुणे स्टेशनवरुन येणार्‍यांना लुटण्याचा होता प्लॅन

Pune Crime | Gangs of thugs ready to rob pedestrians; The plan was to rob those coming from Pune station

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | सेंट्रल बिल्डिंग (Central Building) समोरील जुन्या पडीक घरामध्ये दरोड्याच्या (Robbery) तयारी असलेल्या व पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुंडाच्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Crime Branch Unit Two) पथकाने अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

मयुर राठोड Mayur Rathod (वय 21, रा. गणेशनगर, येरवडा), सुरेश बापू सकट Suresh Bapu Sakat (वय 19, रा. पुणे स्टेशन दग्याजवळ), सरफराज मेहबूब मकानदार Sarfaraz Mehboob Makandar (वय 29, रा. शिवाजीनगर, बेळगाव, कर्नाटक), सुरेश बाबुदास वैष्णव Suresh Babudas Vaishnav (वय 26, रा. कामटेवस्ती, हडपसर) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या साथीदार दीपक ऊर्फ दिप्या रमेश कांबळे Deepak alias Deepya Ramesh Kamble (रा. देहुरोड) हा पळून गेला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकातील पोलीस अंमलदार कादीर शेख (Kadar Sheikh) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble) व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार नेवसे, प्रमोद कोकणे, पटेल, सोनुने हे खाजगी गाडीतून गस्त घालत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सेंट्रल बिल्डिंगसमोरील जुन्या पडक्या घरामध्ये 4 ते 5 गुंड हत्यारासह दबा धरुन बसले असून ते येणार्‍या जाणार्‍या पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारीत आहेत. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीसा पथक तेथे गेले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वत:चे अस्तित्व लपवून थांबले.

 

रात्री दहा वाजता त्यांना जुन्या पडक्या घरामध्ये काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या.
त्यांना मिळालेल्या माहितीनुसार काही जण दिसत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एकमेकांना इशारा करुन अंधारात बसलेल्या चौघांना ताब्यात घेतले.
या गडबडीत एक जण पळून गेला. त्यांच्या अंगझडतीत लोखंडी रॉड, कोयता, मिरची पावडर अशा वस्तू मिळून आल्या.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पुणे स्टेशनकडून (Pune Station) कॅम्पकडे जाणार्‍या येणार्‍या पादचारी लोकांना अंधाराचा फायदा घेऊन शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याकरीता ही शस्त्रे बाळगल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Gangs of thugs ready to rob pedestrians; The plan was to rob those coming from Pune station

 

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात MVA सरकारचे कोसळणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी वरदान, जाणून घ्या कसे ?

Pune Crime | 5 हजाराच्या मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाचे दगडाने ठेचले डोके; आंबेगाव परिसरातील घटना

Maharashtra Rains Update | आगामी 3 ते 4 दिवसात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता – IMD

 

The post Pune Crime | पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारी असलेल्या गुंडाचे टोळके गजाआड; पुणे स्टेशनवरुन येणार्‍यांना लुटण्याचा होता प्लॅन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article