Header

Pune Crime | वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल मालक, बाऊंसरने धुतले ! दोघांचा वाढदिवस एक केक वादातून बाणेर येथील हॉटेलमध्ये भांडणे

Pune Crime | वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल मालक, बाऊंसरने धुतले ! दोघांचा वाढदिवस एक केक वादातून बाणेर येथील हॉटेलमध्ये भांडणे

Pune Crime | Hotel owner bouncer beat youth on his birthday in baner of pune The two quarreled over a birthday cake at a hotel in Baner

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | वाढदिवस साजरा करण्यासाठी ते हॉटेलमध्ये गेले (Birthday Celebration In Baner Hotel). मित्रांनी मागविलेला केक वेटरने आणून दिला. तेव्हा शेजारच्या टेबलावरील मुलीने तिने तो तिच्या बॉयफ्रेंडसाठी (Boy Friend) मागविल्याचे सांगून वाद घातला. त्यात हॉटेल मालक (Hotel Owner) व बाऊंसरनी (Bouncer) तरुणाला मारहाण करुन बाहेर काढले. मित्रांना ढकलून देऊन जखमी केले. वाढदिवसाच्या दिवशी केक (Birthday Cake) ऐवजी तरुणाला मार खाण्याची वेळ आली. (Pune Crime)

 

याप्रकरणी सुस गावात (Susgaon) राहणार्‍या एका २७ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ठिकाणा हॉटेलचा मालक व बाऊंसरवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर रोडवरील महाबळेश्वर चौक (Mahabaleshwar Chowk Baner) येथील ठिकाणा बारमध्ये रविवारी मध्यरात्री घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वाढदिवस होता. त्यांचे मित्र, चुलत भाऊ व मैत्रिण असे मिळून वाढदिवस साजरा करण्यासाठी ठिकाणा बार येथे गेले होते.
मध्यरात्री बारा वाजता फिर्यादी यांच्या मित्राने मागविलेला केक आणला. तेव्हा शेजारी बसलेल्या तरुणीने त्यांच्या टेबलवर येऊन तिने तो केक तिच्या बॉयफ्रेंडसाठी मागविल्याचे सांगून फिर्यादी यांच्याशी वाद घातला.

फिर्यादी हे तिला समजावून सांगत असताना हॉटेलचे बाऊंसर व हॉटेल मालक येथे आले.
त्यांनी फिर्यादी यांच्या शर्टला धरुन त्यांना बाहेर काढले. फिर्यादीच्या मित्रास ढकलून दिले.
त्यांच्या डोक्यास लागून ते जखमी झाले. फिर्यादीच्या चुलत भावाला ओढत बाहेर आणले.
त्यात त्यांच्या डोळ्याचे भुवईवर मारुन जखमी केले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Hotel owner bouncer beat youth on his birthday in baner of pune The two quarreled over a birthday cake at a hotel in Baner

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखीलवाचा:-

The post Pune Crime | वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल मालक, बाऊंसरने धुतले ! दोघांचा वाढदिवस एक केक वादातून बाणेर येथील हॉटेलमध्ये भांडणे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article