Header

Solapur Crime | पोटच्या 16 महिन्याच्या चिमुकलीला दारु पाजून अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी आई-बापाला फाशीची शिक्षा

Solapur Crime | पोटच्या 16 महिन्याच्या चिमुकलीला दारु पाजून अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी आई-बापाला फाशीची शिक्षा

Solapur Crime | daughter murder case mother father parents solapur life sentence solapur district court

सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – Solapur Crime | सोलापूर जिल्ह्यातील एक संतापजनक प्रकार (Solapur Crime) समोर आला आहे. पोटच्या 16 महिन्याच्या मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयाने (Solapur District Court) पती-पत्नीला फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावली आहे.

धोलाराम अर्जुनराम बिष्णोई (Dholaram ArjunRam Bishnoi) (वय, 26), पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (PuniKumari Dholaram Bishnoi) (वय, 20, रा. तेलंगणा, मूळ गाव बारासण, तहसील गुडामालाणी, जि. बाडमेर, राजस्थान) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Solapur Crime)

याबाबत माहिती अशी की, 3 जानेवारी 2022 रोजी धोलाराम बिष्णोई याने मुलीला राहत्या घरी दारू पाजली होती. तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. तिला त्रास होत असल्यामुळे ती रडत होती, तेव्हा ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत पत्नी पुनीकुमारी बिष्णोई हिनेही मदत केली होती. त्यानंतर दोघे मृत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सिकंदराबादहून राजस्थानकडे रेल्वेने जात होते.

दरम्यान, राजकोट एक्स्प्रेसमध्ये जात असताना प्रवाशांना संशय आला.
कर्नाटकातील वाडी रेल्वे स्थानकावर हा प्रकार समोर आला. त्यानंतर दोघांना सोलापूर रेल्वे स्टेशनवर (Solapur Railway Station) नेले. त्यानंतर त्यांच्यावर पास्को कायद्या अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल झाला होता. या दरम्यान, 26 एप्रिल 2022 रोजी कोर्टात खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी जवळपास एकूण 31 साक्षीदार तपासले. त्याचबरोबर नेपाळ येथील साक्षीदाराची तपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली गेली. त्यानंतर न्यायालयाने मोठा निर्णय घेत त्या दोघांना फाशीची शिक्षा दिली आहे.

Web Title :- Solapur Crime | daughter murder case mother father parents solapur life sentence solapur district court

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर; सरासरी जोरदार पावसाची शक्यता – IMD

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Ajit Pawar | राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; अजित पवारांनी दिला ‘हा’ इशारा

Liquor Home Delivery Stopped In Maharashtra | महाराष्ट्रात आता दारूची होम डिलिव्हरी बंद; अजित पवारांनी दिली माहिती

Pune Crime | घरात गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

The post Solapur Crime | पोटच्या 16 महिन्याच्या चिमुकलीला दारु पाजून अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी आई-बापाला फाशीची शिक्षा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article