Header

Ajit Pawar And Devendra Fadnavis | अजितदादा देवेंद्र फडणवीसांची जागा घेणार?

Ajit Pawar And Devendra Fadnavis | अजितदादा देवेंद्र फडणवीसांची जागा घेणार?

Ajit Pawar And Devendra Fadnavis | ncp ajit pawar may get position of opposition leader of maharashtra ncp mla demands infornt of sharad pawar

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन – Ajit Pawar And Devendra Fadnavis | आज विधासभेत बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर राज्यात अधिकृतपणे भाजप आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे नवे सरकार स्थापन झाले आहे. आता राज्याचा नवा विरोधी पक्षनेता कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या विरोधी पक्षनेता पदासाठी अजित पवार यांचे नाव चर्चेत आहे. कारण 53 आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. यापूर्वी शिवसेनेचे आमदार जास्त होते मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवेनेचे 39 आमदार फुटले आहेत. (Opposition Leader Of Maharashtra)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

काल रविवारी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्ष नेते पद देण्यात यावे अशी मागणी उपस्थित आमदारांनी केली. या पदाला अजित पवार योग्य न्याय देऊ शकतात, असे मत आमदारांनी व्यक्त केले. (Ajit Pawar And Devendra Fadnavis)

 

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता कोण असेल, हे ठरवणार आहे.

 

दरम्यान या बैठकीत राज्यातील नवीन सरकार कधीही पडू शकते, मध्यावधी निवडणुकीसाठी तयार रहा असे संकेत स्वपक्षाच्या आमदारांना शरद पवार यांनी दिले आहेत.
यावेळी शरद पवार यांनी शिंदे गटात नाराजी असल्याचे म्हटले.
पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही.
अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे.

 

पवार पुढे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते.
भाजपाच्या गटामध्येही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळता उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने नाराजी आहे.
भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही. त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Ajit Pawar And Devendra Fadnavis | ncp ajit pawar may get position of opposition leader of maharashtra ncp mla demands infornt of sharad pawar

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde Government | राज्यात आता ‘शिंदेशाही’ ! एकनाथ शिंदे सरकारनं बहुमत जिंकले

Small Saving Schemes | पुन्हा वाढले नाहीत PPF, NSC, सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नेत्र चिकित्सक महिलेला दोन लाखांना गंडा; क्रेडिट कार्डला सर्व्हिस चार्ज लागत असल्याचे सांगून केली फसवणूक

 

The post Ajit Pawar And Devendra Fadnavis | अजितदादा देवेंद्र फडणवीसांची जागा घेणार? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article