Header

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Eknath Shinde On Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला आहे. खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत”. यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हे सामान्य माणसाचं सरकार आहे. तसेच रिक्षाच्या वेगाने मर्सिडीजला मागे टाकलं असल्याचं’ ते म्हणाले.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे की, “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार !! “.असं ते म्हणाले. तसेच, एएनआयशी बोलताना शिंदे म्हणाले की, “हे सरकार सर्वसामान्यांचं असल्याने रिक्षाने मर्सिडीजला मागे टाकलं आहे. आम्ही सर्व घटकातील लोकांना न्याय देणार आहोत. प्रत्येकाला आपलं सरकार आहे असे वाटेल अशा पद्धतीने आम्ही कामगिरी करू. हाच मुख्य फरक असल्याचं,” ते म्हणाले.

 

 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

शिवसेनेच्या महिला आघाडीची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवारी) शिवसेना भवनमध्ये घेतली.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे आधी रिक्षाचालक होते याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “अधिवेशनातील भाषणातून हा सगळा कट (बंड) कधी आखण्यात आला होता हे स्पष्ट झालंय.
उपमुख्यमंत्री त्यांना सतत थांबा सांगत होते. पण गाडीचे ब्रेक फेल गेले होते, ते कसे थांबणार ? याआधी ते आम्हाला 3 चाकांचं महाविकास आघाडी सरकार म्हणत होते.
पण आता 3 चाकी चालवणारा सरकार चालवत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

 

हे देखील वाचा :

Jammu Kashmir 2 Terrorists Surrendered | काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाच्या जवांनाची मोठी कारवाई; 2 दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

PM Kisan Yojana | PM किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी माहिती; आधी ‘हे’ काम करा पूर्ण

Edible Oil Price | सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! खाद्यतेलाच्या किंमती आणखी स्वस्त होणार

 

The post Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article