Header

Maharashtra Rains Update | राज्यात पावसाची रिपरिप सुरूच; आतापर्यंत 104 जण दगावले, मुंबईला ‘यलो अलर्ट’

Maharashtra Rains Update | राज्यात पावसाची रिपरिप सुरूच; आतापर्यंत 104 जण दगावले, मुंबईला ‘यलो अलर्ट’

Maharashtra Rains Update | rain in maharashtra 104 people's dead till date

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Maharashtra Rains Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची (Maharashtra Rains Update) रिपरिप सुरूच आहे. अनेक भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तर अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र दिवसभरात रिमझिम दिसून येत आहे. मुसळधार पावसाचा फटका शेतींवरही पडला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दोन आठवड्यापासून सततच्या पडणा-या पावसामुळे नदी, नाले, धरणे दुथडी भरून वाहत आहेत. अशातच अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, 104 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गडचिरोलीत (Gadchiroli) परिस्थिती भयंकर असून गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rains Update)

 

मुंबईत पावसाची रिपरिप…

मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची पातळी आता आवश्यकतेच्या 82 टक्के इतकी आहे, तर तीन तलावही ओसंडून वाहत आहेत. रविवारी मुंबईत फारसा पाऊस झाला नाही. काही भागांत रिमझिम सरी बरसल्या आहेत. मात्र, भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) मुंबई शहरासाठी सोमवारी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. यानुसार आज मुंबईच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Maharashtra Rains Update | rain in maharashtra 104 people’s dead till date

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘वेट अँड वॉच’, ‘तो’ फोटो शेअर करत संजय राऊतांचे सूचक ट्विट

Mumbai Crime | मुंबईतील धक्कादायक घटना ! शेजारी झोपू न दिल्याने पतीने केला पत्नीचा निर्घृण खून

Ashish Shelar On Sanjay Raut | ‘… तर संजय राऊतांनी गजनी सिनेमा बघावा’ – आशिष शेलार

 

The post Maharashtra Rains Update | राज्यात पावसाची रिपरिप सुरूच; आतापर्यंत 104 जण दगावले, मुंबईला ‘यलो अलर्ट’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article