Header

MNS | ‘अब राजा का बेटा राजाही बनेगा’, मनसे नेत्याचं सूचक ट्विट; राजकीय चर्चांना उधाण

MNS | ‘अब राजा का बेटा राजाही बनेगा’, मनसे नेत्याचं सूचक ट्विट; राजकीय चर्चांना उधाण

MNS | MNS chief raj thackeray shivsena chief uddhav thackeray shivsena tweet balasaheb thackeray

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन शिंदे आणि भाजप सरकार (Shinde – BJP Government) स्थापन झाल्यानंतर मनसेचा (MNS) मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेमुळे मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यात राजा का बेटा राजा ही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा, असं ट्विट मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी करुन शिवसेनेला (Shivsena) डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

एकही टीकेची संधी न सोडणारे संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी संदीप देशपांडे यांनी सुपर 30 या हिंदी चित्रपटातील डायलॉग म्हणून टोला लगावला आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा’ याचा मतितार्थ आहे. बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे (Raj Thackeray) पुढे घेऊन जाणार आहेत, बाकी कुणीही नाही, असा दावाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

 

 

हिंदुत्व, मराठी माणसाची, विकासाचा विचार असेल तो राज ठाकरेच पुढे नेत आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारावर कुणाचीही मालकी हक्क नाही.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही आचरणात आणले का? असा सवालच देशपांडे यांनी केला आहे.
बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार केला.
उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र मागतात यापेक्षा मोठं दुर्दैव नाही.
शिवसेनवर आलेल्या या वेळेचं क्रेडिट उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जात, अशी टीकाही देशपांडे यांनी केली.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

केमिकल लोचा कोणाचा झालाय हे स्पष्ट होतंय. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यावरण मंत्री असताना
त्यांनी काय काय काम केली याची आता केंद्र चौकशी करणार आहे.
त्यात काही गैर असेल तर चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही देशपांडे यांनी केली.

 

Web Title :- MNS | MNS chief raj thackeray shivsena chief uddhav thackeray shivsena tweet balasaheb thackeray

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | “धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार” – CM एकनाथ शिंदे

Abdul Sattar On Uddhav Thackeray | ‘…तर पहिल्याच निवडणुकीत किती मतांनी जिंकतो हे दाखवणार’ – अब्दुल सत्तार

Maharashtra Rains Update | राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुढील 3 दिवस मुसळधार – IMD

 

The post MNS | ‘अब राजा का बेटा राजाही बनेगा’, मनसे नेत्याचं सूचक ट्विट; राजकीय चर्चांना उधाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article