Header

Pune Accident News | दुर्दैवी ! लेकीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना हडपसारमध्ये अपघात, बाप लेकीचा जागीच मृत्यू

Pune Accident News | दुर्दैवी ! लेकीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना हडपसारमध्ये अपघात, बाप लेकीचा जागीच मृत्यू

 Pune Accident News | Accident while going to drop daughter to school, father unfortunately died on the spot hadapsar pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  Pune Accident News | पावसामुळे रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुणे सासवड रोडवर (Pune Saswad Road) मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा (Father) मृत्यू झाला. तर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. हा अपघात (Pune Accident News) आज (मंगळवार) सकाळी सातच्या सुमारास सातववाडी येथील ग्लायडिंग सेंटर (Gliding Center Hadapsar Satavadi) समोर झाला.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नीलेश साळुंखे Nilesh Salunkhe (वय 35, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी), मीनाक्षी साळुंखे Meenakshi Salunkhe (वय 10) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बाप लेकीची नावे आहेत. ट्रकचालक दिलीप कुमार पटेल Dilip Kumar Patel (रा. रेवा, मध्य प्रदेश) याला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक केली आहे. (Pune Accident News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी साधना विद्यालयात (Sadhana Vidyalaya Hadapsar Pune) इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. नीलेश हे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी फुरसुंगीहून हडपसरच्या दिशेने चालले होते. सातववाडी येथे पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये नीलेश हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मीनाक्षी दूर फेकली गेल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात (Arrest) घेतले आहे.

 

ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी खड्डे नाही. परंतु सासवड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
भेकराईनगर येथील आयबीएमच्या समोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने हा कचरा रस्त्यावर येऊन रस्ते निसरडे झाले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pune Accident News | Accident while going to drop daughter to school, father unfortunately died on the spot hadapsar pune

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 8 वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता; किती वाढेल वेतन? जाणून घ्या

Maharashtra Rains Update | राज्यात काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

 

The post Pune Accident News | दुर्दैवी ! लेकीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना हडपसारमध्ये अपघात, बाप लेकीचा जागीच मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article