Header

Pune Crime | गंगाधाम रोडवर लिफ्ट मागणार्‍यांनी मारहाण करुन चोरुन नेली दुचाकी

Pune Crime | गंगाधाम रोडवर लिफ्ट मागणार्‍यांनी मारहाण करुन चोरुन नेली दुचाकी

Pune Crime | Those who asked for a lift beat up and stole the bike

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | दुचाकीवरुन जाताना दोघांनी लिफ्ट
मागितली म्हणून त्याने त्यांना लिफ्ट दिली. गंगाधाम रोडवर (Gangadham Road)
सोडायला सांगून आडबाजूला गाडी थांबून दोघांनी चालकाला मारहाण (Beating) करुन
दुचाकी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने वाहनचोरट्याला पकडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. (Pune Crime)

 

याप्रकरणी मार्केटयार्ड (Market Yard) येथील हमालनगरमध्ये राहणार्‍या एका 18 वर्षाच्या तरुणाने फिर्याद (गु. रजि. नं. 773/22) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित रामप्रताप वर्मा Rohit Rampratap Verma (वय 22, रा. गणेनगर, वानवडी) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरुन 24जुलै रोजी रात्री बारा वाजता साळुंखे विहार रोडवरुन जात असताना दोघा जणांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. रात्रीची वेळ असल्याने मदत करण्याच्या भावनेने त्यांनी दोघांना लिफ्ट दिली. त्यांनी अगोदर गंगाधाम चौकापर्यंत सोडा असे सांगितले. त्यानंतर पुढे आईमाता मंदिरसमोर सोडायला सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी तेथे घेऊन गेल्यावर त्यांनी गाडी थांबविली. तेव्हा दोघांनी त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील दुचाकी जबरदस्तीने चोरुन नेली. या प्रकाराने फिर्यादी तरुण घाबरुन गेला होता. त्याने हा प्रकार कोणालाही न सांगता घरी गेला होता. गुन्हे शाखेने वाहनचोरीच्या संशयावरुन रोहीत वर्मा याला पकडले, तेव्हा त्याच्याकडील फिर्यादीची गाडी चोरीचे असल्याचे लक्षात आले.

 

Web Title :- Pune Crime | Those who asked for a lift beat up and stole the bike

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अल्पवयीन मुलीशी ‘संबंध’ ठेवल्याची पोलिसात तक्रार करण्याची धमकी; 67 लाख उकळणार्‍या हडपसर मधील दोघांना अटक, कोंढाव्यात FIR

Tata Group | टाटाच्या ‘या’ स्टॉकद्वारे होईल बंपर कमाई ! एक्सपर्टने 540 रुपयांच्या टार्गेट प्राईससह दिले Buy रेटिंग

Pune News | बहुसोमयाजी यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांचे पुण्यात श्रावण मास शिवपूजन अनुष्ठान

 

The post Pune Crime | गंगाधाम रोडवर लिफ्ट मागणार्‍यांनी मारहाण करुन चोरुन नेली दुचाकी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article