Pune Fire | हडपसरला आगीत 12 घरे जळून खाक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Fire | हडपसरमधील (Hadapsar) रामनगर (Ramnagar) येथील सुरक्षानगरमधील घरांना पहाटे लागलेल्या आगीत १२ घरे जळून खाक झाली. अग्निशामन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहचून ही आग (Pune Fire) १५ मिनिटात नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
रामनगर येथील म्हाडाच्या मागील बाजूला रस्त्याच्या सुरुवातीलाच पत्र्याचे बांधकाम असलेल्या १२ घरांना पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी आगीचा कॉल आला. हडपसर अग्निशमन केंद्रातील (Hadapsar Fire Station) ५ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. रस्त्याच्या सुरुवातीलाच ही घरे असल्याने तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत लोकांनी घरातील जे हाताला लागेल ते सामान घेऊन बाहेर आणले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन घरातून २ गॅस सिलिंडर बाहेर काढले. चारही बाजूने पाण्याचा मारा करुन अग्निशमन दलाने १५ मिनिटात आग आटोक्यात आणली. आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले.
Web Title :- Pune Fire | 12 houses gutted in fire in Hadapsar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
The post Pune Fire | हडपसरला आगीत 12 घरे जळून खाक appeared first on बहुजननामा.