Pune Rape Case | धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन बलात्कार; कर्वे रोडवरुन चाकणला नेऊन केला अत्याचार

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Rape Case | किरकोळ कारणावरुन वाद झाला असताना कॉलेजवर येऊन तेथून दुचाकीवरुन जबरदस्तीने चाकणला (Chakan) घेऊन जाऊन महाविद्यालयीन तरुणीवर (College Girl) बलात्कार (Pune Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) शेरखान शब्बीर सय्यद Sherkhan Shabbir Syed (वय २५, रा. वारजे माळवाडी – Warje Malwadi) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत एका २० वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ८९/२२) दिली आहे. हा प्रकार कर्वे रोडवरील महाविद्यालयापासून चाकण एमआयडीसी येथील वीटभट्टीजवळील एका खोलीत बुधवारी दुपारी २ ते गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडला. (Pune Rape Case)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शेरखान सय्यद यांच्यात एक महिन्यांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे फिर्यादी त्याच्याशी बोलत नव्हत्या. २० जुलै रोजी त्या कॉलेजला गेल्या असताना तो तेथे आला. फिर्यादी यांना तुझ्याशी ५ मिनिटे बोलायचे असे सांगून त्याचा मित्राच्या दुचाकीवर ते ट्रिपल सिट बाहेर आले.
शेरखान याने मित्राला जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना मोटारसायकलवरुन चाकण येथे घेऊन गेला. तेथे बंद खोलीत नेले.
फिर्यादी यांनी विचारणा केल्यावर तू आरडा ओरडा केला तर तुला येथेच मारुन टाकील,
अशी धमकी (Threat) देऊन फिर्यादीवर बलात्कार केला.
फिर्यादीने विरोध केला असता त्यांना हाताने मारहाण केली.
त्यानंतर त्याने फिर्यादी यांना पुन्हा मोटारसायकलवरुन कॉलेजजवळ आणून सोडून दिले व तो पळून गेला.
पोलीस उपनिरीक्षक कवटीकर (Sub-Inspector of Police Kavtikar) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Rape Case | College girl kidnapped and raped
हे देखील वाचा :
National Film Awards 2022 | अजय देवगन, साउथ स्टार सूर्याने जिंकले ‘बेस्ट अॅक्टर अवॉर्ड’
The post Pune Rape Case | धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन बलात्कार; कर्वे रोडवरुन चाकणला नेऊन केला अत्याचार appeared first on बहुजननामा.