Header

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)

Shivajirao Adhalarao Patil | 'या' कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली' - आढळराव पाटील (व्हिडीओ)

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेला पडलेलं खिंडार काही केल्या बुजायचं नाव घेत नाही. आमदारांनंतर (MLA) आता खासदार (MP), जिल्हाध्यक्ष शिंदे गटात (Shinde Group) सामील व्हायला लागले आहेत. पुण्यातही शिवसेनेला (Pune Shivsena) मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेना खिळखिळी झाली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) हल्लाबोल केला. ते म्हणाले मुख्यमंत्री (CM) आमचे असताना देखील आमच्या कर्यकर्त्यांवर गुन्हे (FIR) दाखल झाले. आम्ही शिवसेनेसाठी रात्रंदिवस झटत राहिलो. पण आता आम्ही स्वबळावर मोठं होण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही कधीच हिंदूत्वाचा विचार सोडलेला नाही, असंही आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलं.

 

 

शिरुर मतदार संघातील शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यांची गरज मतदारसंघात होती, ते मतदारसंघात कधीच नव्हते, असा टोला त्यांनी खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांना लगावला. शिवसेनेतील 40 आमदार फुटतात, त्यामुळे कुठेतरी आपण चुकतोय, कुठंतरी धोरणांमध्ये बदल करायला पाहिजे होते. पण ठिक आहे, तसं काही झालं नाही. नेतृत्वाला मान्य होत म्हणून आम्ही गप्प बसलो.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

राज्यात नवी मुख्यमंत्र्यांची नेमणूक झाली. माझं कर्तव्य म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं.
मात्र, पक्षाला माझं अभिनंदन आवडले नाही आणि तिसऱ्या दिवशी माझी हकालपट्टी केली.
गेल्या 15 वर्षापासून काही नसताना मी या जिल्ह्यात काम केलं. तुम्ही एका पोस्टमुळे माझी हकालपट्टी करताय..
मला बोलायचं तरी. विचारायचं तरी, अशी खंत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलून दाखवली.

 

Web Title :- Shivajirao Adhalarao Patil | shirur shivsena ex mp Shivajirao Adhalarao Patil criticism of ncp at pune

 

हे देखील वाचा :

Raigad Sahkari Bank | आता मुंबईतील ‘या’ बँकेत गडबड, 15000 पेक्षा जास्त काढण्यावर RBI ने आणली बंदी

EPFO ला विश्वास, शेयर मार्केटमध्ये येणार्‍या इन्व्हेस्टर्ससाठी ’अच्छे दिन’

Ramdas Kadam | ‘शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला’ ! शिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही’ – रामदास कदम

 

The post Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article