Header

Shivsena | ‘नारायण राणे भाजपच्या टाकलेल्या तुकड्यावर जगतात’, शिवसेनेची टीका

Shivsena | ‘नारायण राणे भाजपच्या टाकलेल्या तुकड्यावर जगतात’, शिवसेनेची टीका

Shivsena | shivsena ambadas danve slams bjp leader and union minister narayan rane over uddhav thackeray statement

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीनंतर शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजप (BJP) नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरेंचे राजकीय कट्टर वैरी असलेल्या नारायण राणे (Narayan Rane) यांनीही या मुलाखतीवरुन उद्धव ठाकरेंवर प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दृष्ट बुद्धीचे असल्याची टीका राणेंनी केली. यानंतर आता शिवसेनेने (Shivsena) राणेंवर घणाघाती टीका केली आहे. नारायण राणे हे भाजपने टाकलेल्या तुकड्यावर जगतात, अशी बोचरी टीका केली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

शिवसेनेचे (Shivsena) आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांना फार गंभीरतेने घेण्याची गरज नाही. ते भाजपने टाकलेल्या तुकड्यावर जगतात. असा खोचक टोला त्यांनी राणेंना लगावला आहे. तसेच बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचाराने शिवसेना उभी केली. पण बाळासाहेबांच्या विचारांना छेद देऊन गद्दारी सुद्धा राणेंनी केली आहे. पक्ष हा शिवसेना प्रमुखांचा असताना तो स्वत:चा करण्याचा प्रयत्न त्यावेळी राणेंनी केलाच होता. मात्र शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तो प्रयत्न हाणून पाडला. म्हणून आजही या धक्क्यातून ते सावरु शकले नाहीत, असे दानवे यांनी म्हटले.

 

दानवे पुढे म्हणाले, नारायण राणे जेवढे आमदार घेऊन गेले होते त्यांचं आता राजकीय अस्तित्व काय आहे ? त्यातले किती लोक आता नारायण राणे यांच्यासोबत आहेत ? हा प्रश्न राणेंनी स्वत: लाच विचारला तर त्यांनाच त्यांचं उत्तर मिळेल. अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

Web Title : –  Shivsena | shivsena ambadas danve slams bjp leader and union minister narayan rane over uddhav thackeray statement

 

हे देखील वाचा :

Pune Crime | व्हिडिओ काढल्याच्या संशयावरुन महिलेच्या त्रासाने तरुणाने केली आत्महत्या; खडक पोलिस ठाण्यात गुन्हा

Central Govt Employees Promotion | केंद्र सरकारची मोठी घोषणा ! सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार आहे प्रमोशन, मंत्री म्हणाले – दोन ते तीन आठवड्यात होईल जाहीर

Supreme Court On PMLA Act | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, PMLA अंतर्गत कारवाईच्या हस्तक्षेपास नकार

 

The post Shivsena | ‘नारायण राणे भाजपच्या टाकलेल्या तुकड्यावर जगतात’, शिवसेनेची टीका appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article