Header

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘सडलेली पानं झडताहेत, ती केराच्या टोपलीत जातील’

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘सडलेली पानं झडताहेत, ती केराच्या टोपलीत जातील’

Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray comment on rebels mla and mp cm eknath shinde group

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Uddhav Thackeray | शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) सध्या राजकीय संघर्ष सुरू आहे. शिवसेना कुणाची ? धनुष्यबाण कोणाचा ? याचा पेच सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. यावरुनच आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली आहे. त्यात अनेक बाबींचा उलगडा करत ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

“सडलेली पानं झडताहेत, ती केराच्या टोपलीत जातील, असा घणाघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी केला आहे. सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पाने सगळे झाडाकडून घेऊनही गळून पडत आहेत. झाड आता उघडंबोडपं झालं आहे. असं दाखवायचा ते प्रयत्न करत आहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो.” असं ते म्हणाले.

 

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “झडलेली, सडलेली पाने केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. अजूनही मोठ्या संख्येने ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटत आहेत. त्यांना शिवसेनेकडून काही मिळावं ही अपेक्षा नव्हती आणि आजही नाही. पण ते येऊन आशीर्वाद देत आहेत. हेच आशीर्वाद शिवसेनेला बळ देतील. आता नवीन कोंब फुटायला लागले आहेत. शिवसेनेचे तरुण आणि युवांशी नाते शिवसेनेच्या जन्मापासूनच आहे.”

 

दरम्यान, “ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केला.
तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवत आहेत. तर, 2014 साली भाजपने (BJP) युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं ? काहीच सोडलं नव्हतं.
आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे.
आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोप घडवण्याची वेळ आलीय.
ज्यांचे आई वडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे.
माझे वडील का चोरताय ?,” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray comment on rebels mla and mp cm eknath shinde group

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चारचाकी वाहने चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 12 लाखांची वाहने जप्त

Share Market | एक्सपार्टना ‘या’ 10 शेअरवर आहे विश्वास, 3-4 आठवड्यातच बदलू शकतात तुमचे नशीब

Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात 1 ऑगस्ट पासून रिक्षाची भाडेवाढ ! ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसणार

 

The post Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘सडलेली पानं झडताहेत, ती केराच्या टोपलीत जातील’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article