Header

Weight Loss Natural Drink | ‘वेट लॉस’साठी मदत करेल काकडी आणि कोथिंबिरीचे हे ‘डिटॉक्स ड्रिंक’, नोट करून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

Weight Loss Natural Drink | ‘वेट लॉस’साठी मदत करेल काकडी आणि कोथिंबिरीचे हे ‘डिटॉक्स ड्रिंक’, नोट करून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

weight loss natural drink cucumber and coriander leaves detox drink recipe for quick weight loss

बहुजननामा ऑनलाइन – Weight Loss Natural Drink | वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी नियमित व्यायामासोबतच निरोगी आहाराची निवड आवश्यक असते. आहारातील अशाच एका आरोग्यदायी गोष्टीचे नाव आहे काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांपासून बनवलेले डिटॉक्स ड्रिंक (Detox Drink). होय, काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांपासून बनवलेले हे डिटॉक्स ड्रिंक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते (Weight Loss Natural Cucumber And Coriander Leaves Detox Drink). या मिश्रणामुळे पोट बराच काळ भरलेले राहिल्याने वारंवार भूक लागत नाही.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

कोथिंबीरमधील पोषक तत्व पोट थंड ठेवण्यास मदत करतात तर काकडी शरीर हायड्रेट करते. या दोन गोष्टींपासून बनवलेल्या डिटॉक्स ड्रिंक्समध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, झिंक (Vitamin B6, Vitamin K, Vitamin C, Riboflavin, Folate, Calcium, Magnesium, Iron, Phosphorus, Zinc) यांसारखे अनेक पोषक घटक असतात. हे वजन कमी करणारे डिटॉक्स ड्रिंक कसे बनवायचे ते जाणून घेवूयात (Weight Loss Natural Drink Cucumber And Coriander Leaves Detox Drink Recipe For Quick Weight Loss)…

 

काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांपासून वेट लॉस डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी साहित्य (Cucumber And Coriander Leaves Detox Drink Ingredients) –

 2 मध्यम आकाराची काकडी

 1 कप कोथिंबीर

 चवीनुसार मीठ

 1 चिमूटभर काळी मिरी

 

काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांनी वजन कमी करण्याचे डिटॉक्स ड्रिंक बनवण्याची कृती (Cucumber And Coriander Leaves Detox Drink Recipe) –

 सर्वप्रथम काकडी नीट धुवून बारीक चिरून घ्या

 ग्राइंडरमध्ये कोथिंबीर घालून चांगली बारीक करा.

 आता ते एका ग्लासमध्ये काढा.

 चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घाला.

 चांगले मिसळा.

 आता तुमचे वजन कमी करण्याचे चविष्ट डिटॉक्स ड्रिंक तयार आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- weight loss natural drink cucumber and coriander leaves detox drink recipe for quick weight loss

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शेजार्‍याला मदत केल्याने महिला अडचणीत; अनाथ आश्रमात आली रहायची वेळ, वारजे माळवाडी परिसरातील घटना

Pune Police | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 निरीक्षक अन् 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

Pune Crime | Rs 200 साठी वारंवार फोन करतो, थांब तुझा मर्डरच करतो; टोळक्याकडून तरुणाला चाकू-दगडाने मारहाण, सिंहगड रोड परिसरातील घटना

 

The post Weight Loss Natural Drink | ‘वेट लॉस’साठी मदत करेल काकडी आणि कोथिंबिरीचे हे ‘डिटॉक्स ड्रिंक’, नोट करून घ्या बनवण्याची योग्य पद्धत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article