Header

Maharashtra Political Crisis | शिंदे विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी अनिश्चित? शिंदे-ठाकरेंची प्रकरणे लिस्टमध्ये नाहीत…

Maharashtra Political Crisis | शिंदे विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी अनिश्चित? शिंदे-ठाकरेंची प्रकरणे लिस्टमध्ये नाहीत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापसासून या सरकारवर अनिश्चिततेचं सावट आहे. शिंदे गटातील आमदारांवर (Shinde Group MLA) अपात्रतेची टांगती तलवार कायम (Maharashtra Political Crisis) असून त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. एकीकडे राज्यातील जनता आणि सत्ताधारी व विरोधक असे सगळेच या सुनावणीकडे आशेने पाहात असताना सुप्रीम कोर्टात मात्र दिल्या जाणाऱ्या तारखांना हे प्रकरण सुनावणीसाठी यादीत समाविष्टच नसल्याने राज्याची धाकधूक वाढली आहे. या प्रकरणाचा निकाल लवकर लागणं आवश्यक असताना न्यायालयात मात्र कामकाजाच्या यादीत (Working List) ही प्रकरणे नसल्याने आजच्या सुनावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमणा (Chief Justice Ramana) हे आज निवृत्त होत आहेत. त्यामुळे महत्त्वाची आणि प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात आली आहेत. यामध्ये गुजरातमधील बिलकिस बानो बलात्कार प्रकरण (Bilkis Bano Rape Case) आणि ईडीला विशेष कायद्यानुसार (ED Special Act) दिलेले अधिकारावर (Authority) फेरविचार याचिका यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे ईडीची सुनावणी ही ओपन कोर्टात होणार आहे. असे असताना महाराष्ट्रातील सत्तासंर्घाचे आणि लोकशाहीसाठी महत्त्वाचे प्रकरण अद्याप पटलावर न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

शिंदे- ठाकरे गटाच्या वादवार सोमवारी सुनावणी (Maharashtra Political Crisis) होणार होती.
यापूर्वी देखील दोन वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारची सुनावणी देखील पुढे ढकलली.
ती मंगळवारी होणार असे सांगितले जात होते.
मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर रात्री उशिरापर्यंत शिंदे-ठाकरे प्रकरण लिस्टच झाले नव्हते. आजही तसाच प्रकार झाला आहे.
न्यायालायने हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे (Constitutional Bench) वर्ग केले होते. याबाबत आज सुनावणी होणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | cm eknath shinde vs shiv sena eknath shinde uddhav thackeray cases are not in the list of supreme court chief justices last day today

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर काढले 2 कोटींचे कर्ज; प्रॉपर्टीवर, पुण्यातील व्यावसायिकाची फसवणुक

Maharashtra Assembly Session | 8 मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Assembly Session | ‘पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर’, ‘युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली’; आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या निशाण्यावर

 

The post Maharashtra Political Crisis | शिंदे विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी अनिश्चित? शिंदे-ठाकरेंची प्रकरणे लिस्टमध्ये नाहीत… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article