Header

Pune Accident News | दुर्दैवी ! पुण्याच्या लोणीकाळभोरमध्ये कंटेनरच्या धडकेत सख्ख्या बहिणी जागीच ठार; मामासह दुचाकीवरून जात होत्या शाळेला

Pune Accident News | दुर्दैवी ! पुण्याच्या लोणीकाळभोरमध्ये कंटेनरच्या धडकेत सख्ख्या बहिणी जागीच ठार; मामासह दुचाकीवरून जात होत्या शाळेला

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Accident News | लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरात कंटेनरने (Container) दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघा शाळकरी मुली जागीच ठार (School Girls Killed) झाल्या. हा भीषण अपघात (Pune Accident News) लोणी स्टेशन चौकात शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.

 

गायत्री नंदकुमार शितोळे Gayatri Nandkumar Shitole (वय १७) आणि राजश्री नंदकुमार शितोळे Rajshree Nandkumar Shitole (वय १०, दोघीही रा. कवडीपाठ, कदमवाक वस्ती, ता. हवेली) अशी मृत्यु (Death) पावलेल्या दोघींची नावे आहेत. त्या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. कंटेनरचे चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. (Pune Accident News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छकुली ही ११ वीला तर राजश्री ही ६ वीला शिकत होत्या. दोघीही लोणी काळभोर येथील पृथ्वराज कपूर मेमोरियल हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये (Prithvaraj Kapoor Memorial High School and Junior College) शिक्षण घेत होत्या. त्या आपला मामा पांडुरंग नवनाथ भिक्षे Pandurang Navnath Bhikshes (वय 42) च्या दुचाकीवरुन शनिवारी सकाळी ७ वाजता शाळेत जात असताना लोणी स्टेशन चौकात एका कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात मामा एका बाजूला पडला तर, मागे बसलेल्या दोघी जणी रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला पडल्या.
दोघींच्या अंगावरुन कंटेनरचे चाक गेल्याने त्यात त्यांचा जागीत मृत्यु झाला.
अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेला असून लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) त्याचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Pune Accident News | Two schoolgirls on two-wheeler killed in collision with container; The morning incident at Loni Station Chowk, when the wheel of the container ran over them

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दहीहंडी उत्सवात गोळीबार, कोयत्याने वार; सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील घटना

MLA Rajan Salvi | ‘आमची निष्ठा मातोश्री चरणी कायम, मला खोक्याची गरज नाही’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर राजन साळवींकडून स्पष्टीकरण

Irrigation scam | सिंचन घोटाळा प्रकरणात ‘या’ अधिकाऱ्याची एन्ट्री, केला गंभीर आरोप म्हणाले – ‘गेल्या 10 वर्षात घोटाळ्याची चौकशीच झाली नाही’

 

The post Pune Accident News | दुर्दैवी ! पुण्याच्या लोणीकाळभोरमध्ये कंटेनरच्या धडकेत सख्ख्या बहिणी जागीच ठार; मामासह दुचाकीवरून जात होत्या शाळेला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article