Header

Pune Crime | पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याच्या आमिषाने 7 जणांची 18 लाखांची फसवणूक; आर्मीमधून रिटायर्ड झालेला नामदेव जायभाये अटकेत

Pune Crime | पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याच्या आमिषाने 7 जणांची 18 लाखांची फसवणूक; आर्मीमधून रिटायर्ड झालेला नामदेव जायभाये अटकेत

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुणे जिल्हा परिषदेत (Pune Zilla Parishad) परिचर व ड्रायव्हर म्हणून नोकरी लावतो (Lure Of Job In Pune ZP), असे आमिष दाखवून ७ जणांकडून तब्बल १८ लाख १३ हजार रुपये घेऊन फसवणूक (Cheating Case) करणार्‍याला विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) अटक केली आहे. (Pune Crime)

 

नामदेव कान्हु जायभाये Namdev Kanhu Jayabhaye (वय ५७, रा. एअर फोर्स स्टेशन) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जायभाये हा लष्करातून निवृत्त झाला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी अंबाजोगाई (Ambajogai) येथील एका ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१६/२२) दिली आहे. हा प्रकार एअर फोर्स चौकात (Air Force Chowk, Pune) मार्च ते एप्रिल २०१३ दरम्यान घडला होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जावई लष्करामध्ये आहे.
त्यांची सदन कमांड येथे नियुक्ती झाली होती. तेव्हा २०१३ मध्ये त्यांची नामदेव जायभाये याच्याशी ओळख झाली.
तो तेव्हा एअर फोर्स ईटेलिजन्स स्कुल येथे काम करीत होता. जायभाये याच्या ओळखीने मुलांना नोकरी लावतो, असे त्यांना समजले.
त्याने फिर्यादी यांना पुणे जिल्हा परिषदेत परीचर, ड्रायव्हर व इतर जागा निघाल्या आहेत.
त्यासाठी कागदपत्र आणून दिल्यास ड्रायव्हरसाठी अडीच लाख परीचरसाठी ३ लाख घेत असल्याचे सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा व इतर ६ नातेवाईकांना नोकरी लावण्यासाठी असे एकूण १९ लाख ५० हजार रुपये जायभाये याला दिले.
त्यांना नोकरी लागत नसल्याने त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा त्याने १९ लाख रुपयांचा धनादेश दिला.
मात्र, पैसे नसल्याने परत गेला. त्यांनी सातत्याने विचारणा केल्यावर त्याने १ लाख ३७ हजार रुपये परत केले.
मात्र, उरलेले पैसे परत केले नाहीत. त्यांनी पुन्हा पुन्हा विचारणा केल्यावर त्याने बाँड पेपरवर ३ महिन्यात हातउसने घेतलेले पैसे परत करतो, असे लिहून दिले.
त्यानंतर त्याने फिर्यादी यांना त्याला दारू पाजून चेक घेतले आहेत.
दारू पाजून बाँड लिहून घेतला, अशी नोटीस पाठवली.
त्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्यादी दिली असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.

 

Web Title : –  Pune Crime | 18 lakh fraud of 7 people with the lure of getting a job in Pune Zilla Parishad Namdev Jaibhai retired from the army arrested

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

हे देखील वाचा :

 

 

The post Pune Crime | पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याच्या आमिषाने 7 जणांची 18 लाखांची फसवणूक; आर्मीमधून रिटायर्ड झालेला नामदेव जायभाये अटकेत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article