Header

Pune Crime | FTII मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, परिसरात खळबळ

Pune Crime | FTII मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, परिसरात खळबळ

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन   Pune Crime | पुणे पुण्यातील फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या Film Television Institute of India (एफटीआयआय-FTII) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने (student) आत्महत्या केल्याची (Committed Suicide) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्यातील (Deccan Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या (Pune Crime) केली हे अद्याप समजू शकले नाही.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

अश्विन अनुराग शुक्ला Ashwin Anurag Shukla (वय-32 रा, गोवा-Goa) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना (Pune Crime) एफटीआयआय मधील बॉयज हॉस्टेल (Boys Hostel) एस 12 बी ब्लॉक रुम मध्ये घडली. आज (शुक्रवार) सकाळी नऊच्या सुमारास हॉस्टेल मध्ये असलेली एक खोली आतून बंद असल्याची माहिती प्रभात मार्शलला (Prabhat Marshall) मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

 

पोलिसांनी खिडकीतून पाहिल्यानंतर आतमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला (Fire Brigade) पाचारण करुन तरुणाचा मृतदेह बाहेर काढून ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अश्विन शुक्ला हा सिनेमा ऑटोग्राफीच्या (Cinema Autography) शेवटच्या वर्षात शिकत होता. पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | A student studying in FTII committed suicide in the hostel

 

हे देखील वाचा :

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर

RBI Repo Rate Hike | रेपो रेटमध्ये 4 महिन्यात तिसऱ्यांदा वाढ, दास यांच्या घोषणेनंतर 5.40 टक्क्यांवर पोहचला; RBI च्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

Pune RTO | पुणे RTO कडून दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

 

The post Pune Crime | FTII मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, परिसरात खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article