Header

Pune Crime | सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन दोन गटात राडा; लोखंडी कात्री, दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन दोन गटात राडा; लोखंडी कात्री, दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | सिगारेट (Cigarettes) व पाण्याच्या बाटलीच्या किंमतीवरुन झालेल्या वादात दोन गटाने परस्पराना मारहाण (Beating) करुन राडा घातला. तरुणाच्या खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) करणार्‍या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी (Bundagarden Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत स्वप्निल दत्तु कांबळे Swapnil Dattu Kamble (वय २३, रा. विश्वदीप तरुण मंडळापाठीमागे, ताडीवाला रोड – Tadiwala Road) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नौशाद शेख (Naushad Sheikh), हुसेन खान (Hussain Khan), वसीम सय्यद (Wasim Sayyed), कासीम शेख Qasim Sheikh (सर्व रा. ताडीवाला रोड) यांना अटक केली आहे. हा प्रकार ससून रोडवरील जहांगीर हॉस्पिटलसमोरील (Jehangir Hospital) मंजुर पान शॉप येथे सोमवारी मध्यरात्री १२ ते पहाटे पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
नौशाद शेख याचे मंजुर पान शॉप आहे. स्वप्निल कांबळे हा मित्रासह सिगारेट व पाण्याची बाटली घेण्यासाठी पान शॉपवर गेला होता.
त्यावेळी सिगारेट व पाण्याच्या बाटलीच्या किंमतीवरुन त्यांच्यात वाद झाले.
तेव्हा त्यांनी मारहाण केल्याने फिर्यादी यांच्या मोटारसायकलची चावी तेथेच पडली. तेव्हा तो घाबरुन विना चावीची मोटारसायकल घेऊन निघून गेला. त्यानंतर तो मित्रांना घेऊन पहाटे पावणे तीन वाजता आला.
तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करुन तु पुन्हा येथे आला म्हणून फिर्यादी व त्याच्या मित्रांना लाकडी दांडक्याने,
लोखंडी पाईप, लोखंडी कात्री व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार करण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला.
पोलीस उपनिरीक्षक कोळेकर (Sub-Inspector of Police Kolekar) तपास करीत आहेत. (Pune Crime)

 

याविरोधात वसीम हाजी मलंग सय्यद (Wasim Haji Malang Syed) (वय ३०, रा. प्रायव्हेट रोड) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२२/२२) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी स्वप्नील कांबळे (Swapnil Kamble), निलेश धनगर (Nilesh Dhangar), कुमार कोळी Kumar Koli (सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
फिर्यादी हे नौशाद शेख, हुसेन खान व कासीम शेख हे मंजुर पान शॉपवर असताना आरोपी यांनी तेथे येऊन फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या डोक्यात रिकाम्या बिअरच्या बाटल्या मारुन जखमी केले.
पोलीस उपनिरीक्षक गोरड (Sub-Inspector of Police Gord) तपास करीत आहेत.

 

 Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Web Title : –  Pune Crime | Cigarettes water bottles in two groups Attempted death by beating with iron scissors stones

 

हे देखील वाचा :

Pune Rain | वरसगाव धरणही १०० टक्के भरले; पुणे जिल्ह्यातील १० धरणे १०० टक्के फुल्ल, खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेक विसर्ग

MLA Prakash Surve | ‘हात तोडता आला नाही तर पाय तोडा’, शिंदे गटातील आमदाराचे चिथावणीखोर वक्तव्य

Surya Nutan | 12 हजारात घरी आणा हा स्टोव्ह, कधीही भासणार नाही सिलेंडर खरेदी करण्याची गरज

 

The post Pune Crime | सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन दोन गटात राडा; लोखंडी कात्री, दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article