Header

Pune Crime | बिबवेवाडी गोळीबार प्रकरणातील मोक्कातील आरोपींना जामीन

Pune Crime | बिबवेवाडी गोळीबार प्रकरणातील मोक्कातील आरोपींना जामीन

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  Pune Crime | बिबवेवाडी परिसरात गोळीबार (Bibwewadi Firing) करुन दहशत माजविणाऱ्या १३ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्का अंतर्गत (Mokka Act) कारवाई केली होती. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आता त्यातील चौघा आरोपींना जामीन मंजूर (Bail Granted) करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

आकाश शिळीमकर (Akash Shilimkar), शुभम रोकडे (Shubham Rokade), रोहन लोंढे (Rohan Londhe), अजय आखाडे (Ajay Akhade) अशी जामीन मिळालेल्या चौघांची नावे आहेत. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर नावंदर (Special District and Sessions Judge SR Navander) यांनी हा निर्णय दिला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पूर्ववैमनस्यातून गणेश जगदाळे टोळीने (Ganesh Jagdale Gang) ६ फेब्रुवारी रोजी बिबवेवाडीतील शिवशंकर सोसायटीत (Shiv Shankar Society, Bibvewadi) मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. तसेच कोयते, दांडके आणि पिस्तुल (Pistol) हातात घेऊन दुचाकीवरुन फिरत परिसरात दहशत निर्माण केली होती. बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करुन १३ जणांना अटक (Arrest) केली. (Pune Crime)

 

दरम्यान त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आरोपीचे नाव एफआयआरमध्ये नाही तसेच इतर कोणताही गुन्हा त्यांच्यावर दाखल नाही.

 

त्यामुळे त्यांचे विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करता येणार नाही, असा ॲड. अमेय सीरसीकर (Adv. Amey Seersikar),
ॲड. प्रसाद रेणुसे (Adv. Prasad Renuse) यांनी युक्तीवाद केला.
सत्र न्यायाधीश एस आर नावंदर यांनी हा युक्तीवाद ग्राह्य धरुन चौघांना जामीन मंजूर केला.

 

Web Title :- Pune Crime | Bail to Mokka accused in Bibwewadi firing case

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | ACB ची नाशिकमध्ये मोठी कारवाई ! 28 लाख रुपये लाच घेणाऱ्या आदिवासी विभागाच्या बड्या अधिकाऱ्याला अटक

Mumbai-Pune Expressway | उद्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ वेळेत ट्रॅफिक ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव यंदा ‘अध्यक्षाविनाच’; अध्यक्षपदासाठीच्या ‘स्पर्धेमुळे’ निवड लांबली

 

The post Pune Crime | बिबवेवाडी गोळीबार प्रकरणातील मोक्कातील आरोपींना जामीन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article