Pune Crime | पतीला संबंधाबाबत सांगण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील घटना
पुणे : ऑनलाइन – Pune Crime | इंस्टाग्रामवरुन (Instagram) ओळख करुन महिलेला लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून आपल्याबरोबरच्या संबंधाबाबत पतीला सांगण्याची धमकी (Threat) देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अनिकेत वासुदेव राठोड Aniket Vasudev Rathod (वय २८, रा. अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत घोरपडी गावातील एका ३६ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) (गु. रजि. नं. १०९१/२२) दिली आहे. हा प्रकार हडपसर, लोणी येथील लॉजवर २०१९ ते २० आॅगस्ट २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत राठोड याने इंस्टाग्रामवरुन फिर्यादीसोबत ओळख करुन घेतली. त्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवले.
फिर्यादीबरोबरचे संबंधाबाबत फिर्यादीचे पती यांना सांगण्याची धमकी देऊन त्यांना वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन
त्यांच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवून लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले.
शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक गांधले (Sub-Inspector of Police Gandhle) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A woman was sexually assaulted by threatening to tell her husband about the affair, an incident in Hadapsar area
हे देखील वाचा :
Uric Acid | ‘या’ 5 वनस्पती परिणामकारक पद्धतीने करतात अॅसिड कंट्रोल, जाणून घ्या
The post Pune Crime | पतीला संबंधाबाबत सांगण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.