Header

Pune Crime | डोक्यात मारहाण करुन महिलेचा खून, कारण अद्याप अस्पष्ट

Pune Crime | डोक्यात मारहाण करुन महिलेचा खून, कारण अद्याप अस्पष्ट

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | घरातून निघून गेलेल्या महिलेच्या डोक्यात मारहाण (Beating) करुन तिचा खून (Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. गिता राजेशकुमार कुंभार Geeta Rajkumar Kumbhar (वय 46, रा. ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ, पर्णकुटी पायथा, येरवडा) असे खून झालेल्या (Pune Crime) महिलेचे नाव आहे.

 

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके (API Pramod Khatke) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५६/२२) दिली आहे. हा प्रकार ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ अडगळीच्या ठिकाणी 31 जुलैला मध्यरात्री दीड वाजेपासून 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिता कुंभार यांना पती, 3 मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
त्या यापूर्वीही अनेकदा घरातून बाहेर निघून गेल्या होत्या. 31 जुलै रोजी त्या अशाच कोणाला काही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या.
त्यानंतर घराजवळील झाडी झुडपात अडगळीच्या जागेत दुसर्‍या दिवशी सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
त्यांच्या डोक्यावर मारहाण करुन त्यांना जखमी करुन त्यांचा खून केला असल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे.
खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक चक्रे (Police Inspector Chakre) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder of a woman by beating her head, reason still unclear

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | सुनावणी आधी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात मांडली बाजू, शिंदे गटाला धक्का बसणार ?

Uday Samant | आमदार उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या ६ जणांना अटक

Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरण ; National Herald सहित 12 ठिकाणांवर ईडीचे छापे

 

The post Pune Crime | डोक्यात मारहाण करुन महिलेचा खून, कारण अद्याप अस्पष्ट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article