Header

Pune Crime | तरुणाच्या डोक्यात दगड घालून केला खून, हडपसर परिसरातील घटना

Pune Crime | तरुणाच्या डोक्यात दगड घालून केला खून, हडपसर परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | दोघांमध्ये दारू पिताना झालेल्या वादात डोक्यात दगड घालून मित्राचा खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनिल राजू सासी Anil Raju Sasi (वय ३३, रा. इंदिरानगर वसाहत, वैदवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी त्याचा भाऊ अक्षय राजू सासी Akshay Raju Sasi (वय २५, रा. इंदिरानगर वसाहत, वैदवाडी, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९८१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रविण नामदेव नाईक Pravin Namdev Naik (वय ४१, रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार वैदवाडी कॅनॉलजवळ २ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडला होता. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण आणि अनिल हे दोघे मित्र होते.
प्रविण आणि अनिल हे दोघे वैदवाडी कॅनॉलजवळील नर्मदाबाई कांबळे शाळेच्या (Narmadabai Kamble School) मागे दारु पिण्यास बसले होते.
तेव्हा त्यांच्यात भांडणे झाली. त्याचा राग मनात धरुन प्रविण याने अनिल याच्या डोळ्याच्या बाजूला व कपाळावर दगडाने मारले.
त्यात अनिल हा गंभीर जखमी झाला होता. त्याला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल केले होते.
तेथे उपचार सुरु असताना रविवारी पहाटे त्याचा मृत्यु झाला.
त्यानंतर पोलिसांनी खूनाच्या कलमाचा गुन्ह्यात समावेश करुन प्रविण नाईक याला अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक डांगे (Assistant Police Inspector Dange) तपास करीत आहेत.

 

 
Web Title : – Pune Crime | A young man was killed by a stone on his head due to an argument over drinking

The post Pune Crime | तरुणाच्या डोक्यात दगड घालून केला खून, हडपसर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article