Sanjay Raut | संजय राऊत वापरत होते बिल्डरच्या लक्झरी कार, ED च्या तपासात उघड
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पत्रा चाळ प्रकरणी (Patra Chawl Scam) अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते (Shiv Sena Spokesperson) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा (Luxury Vehicles) वापर करत होते, अशी माहिती ईडीच्या (ED) तपासात समोर आली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सच्या (Shraddha Developers) संचालकांच्या मालकीच्या या दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय करत होते. संजय राऊतांचे (Sanjay Raut) बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहे. एका इंग्रजी वृत्तवाहीनीने याबाबत वृत्त दिले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बुधवारी ईडीने मुंबईसह अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये पूर्व उपनगरातील रिअल इस्टेट डेव्हलपरचाही (Real Estate Developer) समावेश होता.
सूत्रांच्या माहितीनुसार पत्रा चाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब श्रद्धा डेव्हलपर्समधील संचालकांच्या मालकींच्या गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले.
ईडीच्या पथकाने श्रद्धा डेव्हलपर्सच्या मुलुंड येथील कार्यालयातील कागदपत्रं आणि संगणकाची तपासणी केली.
श्रद्धा डेव्हलपर्सचे भांडूप, मुलुंड, विक्रोळीत अनेक प्रकल्प सुरु आहेत.
31 जुलैला निवासस्थानी छापा टाकण्यात आल्यानंतर ईडीला संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब श्रद्धा डेव्हलपर्समधील संचालकांची मालकी असलेल्या दोन अलिशान गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती मिळाली होती.
Web Title : – Sanjay Raut | ed found that 2 vehicles belonging to a builder were being used by sanjay raut
हे देखील वाचा :
Sameer Wankhede | समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी, गोरेगाव पोलीस ठाण्यात FIR
The post Sanjay Raut | संजय राऊत वापरत होते बिल्डरच्या लक्झरी कार, ED च्या तपासात उघड appeared first on बहुजननामा.