Header

Sonali Phogat Passes Away | टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन, गोव्यात हार्ट अटॅकने गमावला जीव

Sonali Phogat Passes Away | टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन, गोव्यात हार्ट अटॅकने गमावला जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sonali Phogat Passes Away | टिकटॉक स्टार (TikTok Stars India) आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन (BJP Leader Sonali Phogat Death) झाले आहे. 42 वर्षीय सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. सोनाली फोगाट यांनी 2019 मध्ये हरियाणा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर आदमपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. निवडणुकीदरम्यान, त्या टिकटॉकवरील त्यांच्या व्हिडिओंसाठी खूप लोकप्रिय होत्या. (Sonali Phogat Passes Away)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांचे सोमवारी रात्री गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या भाजप नेत्यांसोबत गोव्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूच्या काही वेळापूर्वी सोनाली फोगाट यांनी स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यासोबतच त्यांनी ट्विटर अकाऊंटवरील प्रोफाईल पिक्चरही बदलले आहे. स्थानिक प्रशासन त्यांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. (Sonali Phogat Passes Away )

 

Big Boss 14 मध्ये होत्या सोनाली फोगाट

सोनाली फोगाट बिग बॉस-14 या रिअ‍ॅलिटी शोचा भाग होत्या. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. त्यांनी सांगितले होते की पतीच्या निधनानंतर एक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आली, काही कारणांमुळे हे नाते पुढे जाऊ शकले नाही. मात्र, सोनालीने त्या व्यक्तीचे नाव सांगितले नव्हते.

 

आदमपूर जागेवर पुन्हा केला होता दावा

सोनाली फोगाट यांनी 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यांचा काँग्रेसच्या कुलदीप बिश्नोई यांनी पराभव केला. आता कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना ही जागा त्यांच्या मुलाला द्यायची आहे. त्याचवेळी या जागेवर होणार्‍या पोटनिवडणुकीत सोनाली फोगाट यांनीही आपला दावा केला होता.

अलीकडेच कुलदीप हे सोनाली फोगाट यांना भेटण्यासाठी बिश्नोईला पोहोचले होते. ही जागा गेल्या 55 वर्षांपासून बिश्नोई कुटुंबीयांच्या ताब्यात आहे. सध्या या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्षांनी येथे आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. कुलदीप बिश्नोई यांना त्यांच्या मुलाला येथून निवडणुकीसाठी उभे करायचे आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

कोण आहे सोनाली फोगाट ?

सोनाली फोगाट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला. सोनाली यांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे.
सोनाली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंगपासून केली होती.
दोन वर्षांनी म्हणजे 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षासाठी काम करण्यास सुरुवात केली.

सोनाली फोगाट 2016 मध्ये प्रकाशझोतात आल्या जेव्हा त्यांचे पती संजय यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला.
सोनाली त्यावेळी मुंबईत होत्या. पतीच्या निधनानंतर सोनाली खचल्या होत्या.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आदमपूरमधून सोनाली फोगाट यांना तिकीट दिले.
पण त्यांचा पराभव झाला, मात्र त्यांच्या नशीबाने येऊन वेगळे वळण घेतले.

2020 मध्ये सोनाली फोगाट यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये सोनाली फोगाट एका अधिकार्‍याला चप्पलने मारताना दिसत होत्या.
त्याच वर्षी सोनाली यांना बिग बॉस-14 च्या घरात प्रवेश करण्याची संधी मिळाली.
सोनाली या टिकटॉक स्टार होत्या आणि अनेक संगीत अल्बममध्ये दिसल्या आहेत. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव यशोधरा आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Sonali Phogat Passes Away | BJP leader and tiktok star sonali phogat passed away due to heart attack in goa

 

हे देखील वाचा :

PM Kisan-Pune | पीएम किसान योजनेच्या चुकीच्या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात जिल्हा प्रशासन ‘फेल’

Ajit Pawar | अजित पवार सत्ताधारी आमदारावर भडकले; म्हणाले – ‘अरे थांब ना बाबा.. आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?’

Chandrakant Patil | ‘त्या’ विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तरपर्यतची फी राज्य सरकार भरणार – चंद्रकांत पाटील

 

The post Sonali Phogat Passes Away | टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन, गोव्यात हार्ट अटॅकने गमावला जीव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article