Bath Tips | 15 मिनिटापेक्षा जास्त आंघोळ करणे आरोग्यासाठी नुकसानकारक, या 5 चूका करणे टाळा
बहुजननामा ऑनलाइन टीम – Bath Tips | अंघोळ (Bath) करताना अनवधानाने होणार्या चुका आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे तुमच्या त्वचेलाच नाही तर केसांनाही मोठे नुकसान होऊ शकते. आंघोळ करताना, आपण साबण आणि शॅम्पूमध्ये असलेल्या रासायनिक उत्पादन (chemical products) ची काळजी घेतली पाहिजे, ज्याचे भयानक दुष्परिणाम होऊ शकतात. (Bath Tips)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्वचा कोरडी होऊ शकते
मेडिसिन डायरेक्टचे सुपरिटेंडेंट फार्मासिस्ट हुसेन अब्देह (Hussein Abdeh, superintendent of medicine at Medicine Direct) यांनी यापैकी काही चुका जवळून पाहिल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बहुतेक साबण किंवा शॅम्पू (soaps or shampoos) बराच वेळ लावल्यानंतर त्यांचा त्वचेवर कोरडेपणा येऊ लागतो.
त्यामुळे साबण किंवा शाम्पू वापरल्यानंतर शॉवर (shower) खाली शरीर आणि केस चांगले धुणे महत्त्वाचे आहे. अन्यथा तुमची त्वचा कोरडी होऊ शकते, त्वचेला तडे जाऊ शकतात. (Bath Tips)
इतके मिनिटेच घ्या शॉवर
तज्ञांनी शॉवरखाली बराच वेळ उभे राहण्याविरूद्ध इशारा देखील दिली आहे. ते म्हणतात की, शॉवरखाली बराच वेळ आंघोळ केल्यानंतरही त्वचा कोरडी होते. याशिवाय, त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो आणि ती संवेदनशील होऊ शकते. तज्ञांनी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ शॉवर घेणे योग्य मानलेले नाही.
साबणाचेही आहेत तोटे
हार्वर्ड हेल्थच्या म्हणण्यानुसार, शाम्पू, कंडिशनर आणि साबणांमध्ये असलेले तेल, परफ्यूम आणि इतर घटकांचेही तोटे आहेत. या सर्व गोष्टी अॅलर्जीक रिअॅक्शनला प्रोत्साहन देऊ शकतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हेल्थ बॉडी म्हटले आहे की, आंघोळीची वारंवारता ही आंघोळीच्या कालावधीइतकीच महत्त्वाची आहे. मात्र, आंघोळीची कोणतीही आदर्श वारंवारता ठरलेली नाही.
दीर्घकाळ आंघोळीने समस्या
तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचेला तडे जाऊ शकतात, ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा अॅलर्जी निर्माण करणारे घटक त्वचेत सहज प्रवेश करू शकतात. अँटी बॅक्टेरियल साबण नॉर्मल बॅक्टेरियांना सुद्धा नष्ट करू लागतो.
त्यामुळे त्वचेवरील मायक्रो ऑर्गेनिज्मचे संतुलन बिघडते आणि त्वचेसाठी कमी अनुकूल सूक्ष्मजंतूंना प्रोत्साहन देतो अँटीबायोटिक्स औषधाच्या बाबतीत अधिक प्रतिरोधक असतात.
याशिवाय, आपल्या इम्यूनिटी सिस्टमला सुद्धा प्रोटेक्टिव अँटीबॉडीज आणि इम्यून मेमोरीसाठी नॉर्मल मायक्रोऑर्गेनिज्म,
घाण आणि इतर एनव्हायरोमेंटल जोखिमद्वारे एका ठरावकि मात्रेत उत्तेजनाची आवश्यकता असते.
याशिवाय ज्या पाण्याने आपण शरीर स्वच्छ करतो त्यामध्ये सुद्धा मीठ, हेवी मेटल, क्लोरिन, फ्लुओराईड,
पेस्टीसाईड्स आणि अनेक प्रकारचे केमिकल असतात. पाण्यातील ही तत्व सुद्धा समस्या निर्माण करू शकतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Bath Tips | we should not make these 5 mistakes during bath
हे देखील वाचा :
Arthritis | यूरिक अॅसिड असे करा कंट्रोल, ‘या’ 5 उपायांनी होऊ शकते सांधेदुखीपासून सुटका
The post Bath Tips | 15 मिनिटापेक्षा जास्त आंघोळ करणे आरोग्यासाठी नुकसानकारक, या 5 चूका करणे टाळा appeared first on बहुजननामा.