Best Multibagger Stock 2022 | शेअर बाजाराच्या वाटचालीवर मात करणारा स्टॉक, वर्षभरात पैसे झाले दुप्पट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Best Multibagger Stock 2022 | गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठल्यानंतर शेअर बाजारामध्ये (Share Market) घसरणीचा कल आहे. मात्र, या कालावधीतही अनेक शेअरनी बाजाराच्या वाटचालीवर मात करत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे (Best Multibagger Stock 2022). आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. गंमत अशी आहे की दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani) यांचाही या स्टॉकवर खूप विश्वास आहे आणि दीर्घकाळापासून हा शेअर त्यांच्या पोर्टफोलिओचा भाग आहे (Radhakishan Damani Portfolio).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एका वर्षात दिला इतका रिटर्न
आर. के. दमानी यांच्या पोर्टफोलिओ (Radhakishan Damani Portfolio) मध्ये समाविष्ट असलेल्या Astra Microwave Products बद्दल आपण बोलत आहोत. या शेअरने मागील एक वर्ष, सहा महिने आणि वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत, अशा तीनही श्रेणींमध्ये मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Return) दिला आहे. गेल्या एका वर्षाबद्दल बोलायचे तर तो 157.65 रुपयांवरून 334 रुपयांपर्यंत गेला. अलीकडेच त्याने 375.15 रु. हा 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे. शेवटच्या दिवसांत त्यात घसरण झाली, पण तरीही हा शेअर 333.95 रुपयांच्या पातळीवर आहे. गेल्या काही हंगामात, त्याने 52-आठवड्यांचा रेकॉर्ड सातत्याने सुधारला आहे. (Best Multibagger Stock 2022)
सातत्याने दिला मल्टीबॅगर रिटर्न
गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 245 रुपयांवरून 334 रुपयांपर्यंत वाढला आहे. अशा प्रकारे, केवळ एका महिन्यात 30 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत, 175 ते 332 रुपयांपर्यंतचा प्रवास पूर्ण करून 80 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. गेल्या एका वर्षात तो 100 टक्क्यांच्या वर गेला आहे आणि अशा प्रकारे या शेअरने या कालावधीत गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे दिले आहेत.
दमाणी यांच्याकडे इतके शेअर्स
Astra Microwave Products च्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर, जून 2022 च्या आकड्यांनुसार, दमानी यांच्याकडे या कंपनीचे 8,96,387 शेअर्स होते.
हे कंपनीतील सुमारे 1.03 टक्के भागीदारीच्या समतुल्य आहे.
मार्च तिमाहीच्या अखेरीस दमानी यांच्याकडे Astra Microwave Products चे 8,96,387 शेअर्स होते.
याचा अर्थ दिग्गज गुंतवणूकदार आर. के. दमाणी यांचा या शेअरवरील विश्वास अबाधित राहिला आहे.
Web Title :- Best Multibagger Stock 2022 | Best Multibagger Stock 2022 Is Astra Microwave Products Radhakishan Damani Share Stock Market Marathi News
हे देखील वाचा :
Dragon Fruit | ड्रॅगन फ्रुटमध्ये आहे जबरदस्त ताकद, ‘या’ आजारांचा धोका करते कमी
Pune Pimpri Crime | शाळेतून घरी जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, निगडीतील भेळ चौकातील घटना
Peeing After Alcohol Drinking | दारू प्यायल्यानंतर लघवीला जास्त का होते? जाणून घ्या कारण आणि धोका
The post Best Multibagger Stock 2022 | शेअर बाजाराच्या वाटचालीवर मात करणारा स्टॉक, वर्षभरात पैसे झाले दुप्पट appeared first on बहुजननामा.