Header

CM Eknath Shinde | याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

CM Eknath Shinde | याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन (Yakub Memon) याच्या कबरीचे सुशोभिकरण प्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आज दुसर्‍या दिवशी प्रतिक्रिया आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. या प्रकरणी जास्त बोलण्याचे शिंदे यांनी टाळले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाच्या मुद्द्यावरून भाजपाने महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर (Shiv sena) आरोप करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, शिंदे यांची अद्याप प्रतिक्रिया आली नव्हती, आज त्यांनी यावर थोडक्यात प्रतिक्रिया देत कुणावरही आरोप करणे टाळले आहे.

 

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभिकरण झाल्याचे उघड झाल्यानंतर आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधाला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आज गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांना मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणाच्या विषयावरून छेडले असता मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, सध्या पोलीस
या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, शिवाय त्यांच्याकडे मंत्रिमंडळातील महत्वाचे
खाते होते. शिंदे यांना देखील हे प्रकरण तसे पहायला गेल्यास अडचणीचे आहे.
यामुळेच शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणे आणि कुणावरही आरोप करणे टाळले असल्याचे बोलले जात आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | first reaction of chief minister eknath shinde in yakub memon case

 

हे देखील वाचा :

Milk Cream Benefits | चेहर्‍यावर मलई लावल्याने होतात 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या सविस्तर

Unwanted Moles | चेहर्‍याचे सौंदर्य घालवतात नको असलेले तीळ, ‘ते’ हटवण्यासाठी 10 घरगुती उपाय; जाणून घ्या

Ajit Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘ज्या माणसाला स्वत:चा पक्ष उमेदवारी देत नाही, त्याने काय गप्पा माराव्यात’, अजित पवार यांचा बावनकुळेंना टोला

 

The post CM Eknath Shinde | याकूब मेमन प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article