Header

Devendra Fadnavis | खुशखबर ! पोलिसांना खात्यांतर्गतच 20 लाखापर्यंतचं कर्ज; गणेशोत्सवात फडणवीसांचं मोठं गिफ्ट

Devendra Fadnavis | खुशखबर ! पोलिसांना खात्यांतर्गतच 20 लाखापर्यंतचं कर्ज; गणेशोत्सवात फडणवीसांचं मोठं गिफ्ट

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये बदल केले तर काही निर्णय रद्द केले आहे. ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतलेला महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) बाबतीतील एक निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदलून पोलिसांना गणेशोत्सव काळात मोठं गिफ्ट दिलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कॉन्स्टेबल दर्जाच्या (Police Constable) अधिकाऱ्यांना खात्यातूनच मिळणारी कर्ज (Loan) सेवा पून्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक पोलिसांना फायदा होणार आहे.

 

महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांना खात्यातूनच कर्ज सेवा पुरवली जात होती. मात्र, ही सेवा ठाकरे सरकारने काही कारणास्तव बंद केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, डीजी कर्ज (DG Loan Scheme) खात्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस कर्मचाऱ्यांना गृह विभागाकडूनच 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही योजना पुन्हा सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना 15 लाखात स्वत:च्या मालकीची घरे देण्याची घोषणा केली होती.
तसेच याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर पाच दिवसात शासन निर्णय गृहविभागाने (Home Department) जाहीर केला.
त्यामुळे प्रतिक्षेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Web Title :-  Devendra Fadnavis | maharashtra police dg loan bjp leader and home minister devendra fadnavis restarted the loan service

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भाड्याने फ्लॅट देण्याची जाहिरात वेबसाईटवर करणे पडले महागात; लोहगावमधील तरूणाची 1 लाख 38 हजाराची फसवणूक

Pune Rain | पुण्यात पावसामुळे 14 ठिकाणी झाडे कोसळली; गॅस वाहिनी तुटली, 7 ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटच्या घटना

Pune Crime | तलाक दिलेल्या पत्नीने पतीवर केला चाकूहल्ला; पिसोळीतील घटना, तलाक दिल्यानंतरही तो ठेवून होता तिच्यावर नजर

e-Search Report Maharashtra | ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू

 

The post Devendra Fadnavis | खुशखबर ! पोलिसांना खात्यांतर्गतच 20 लाखापर्यंतचं कर्ज; गणेशोत्सवात फडणवीसांचं मोठं गिफ्ट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article